पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे व पोलिस विभागाचे अधिकारी राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात संयुक्त पथकाने रविवारी ( पेंढरी (पारशिवनी ) शिवारात पेढरी ते सुवरधरा मार्गावर केलेल्या संयुक्त कारवाई मध्ये रेतीची अवैध वाहतूक करणारा बिना नम्बर चा ट्रॅक्टर पकडला . यात एक ब्रास रेती सह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून , दोघांना अटक करण्यात आली आहे , अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली . आरोपी चंद्रशेखर फुलचंद काळसर्पे व अश्वजित प्रभू लांजेवार , दोघेही रा. निंबा , ता. पारशिवनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पेंढरी शिवारातून मोगरा नाल्या तुन रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने एक ट्रॅक्टर येताना दिसला. त्यांनी ट्रॅक्टर अडवून झडती घेतली. त्यांच्या ट्रॉलीत एक ब्रास रेती आढळून आली कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीी विना रॉयल्टी वाहतूक असल्याचे चौकशीत स्पष्ट होताच आरोपी चंद्रशेखर काळसर्पे व अश्वजित लांजेवार या दोघांना ताब्यात घेत अटक केली . त्यांच्याकडून रेती व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या ट्रॅक्टर मधी रेती नाल्यातील असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले . ही कारवाई महसुल विभागाचे तलाठी कृष्णा माने , देवाशिष देशमुख , गणेश चव्हाण , तर पोलिस विभागातुन पोलिस हवालदार मुदस्सर जमाल , महेश फुलझेले , प्रमोद कोठे यांच्या पथकाने यशस्वी कार्यवाही केली