रोजगार मेळाव्यातून ६०० विद्यार्थ्यांना नोकऱ्या

-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशिक्षण व रोजगार सेलचे नियोजन

नागपूर :- शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त व्हावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रशिक्षण व रोजगार सेल स्थापित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण व रोजगार सेल अंतर्गत गत सात महिन्यांमध्ये तब्बल ६०० विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संधी तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यात प्रशिक्षण व रोजगार सेल यशस्वी होत आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण व रोजगार अधिकारी डॉ. भूषण महाजन यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व रोजगार सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागांतर्गत १ ऑगस्ट २०२२ ते फेब्रुवारी २०२३ अखेर एकूण ५४ कंपन्यांनी त्यांचे रोजगार मिळावे विद्यापीठ अंतर्गत आयोजित केले. या विभागाअंतर्गत ६०० विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ५ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज प्राप्त झाले आहे. नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण व रोजगार सेल तसेच विद्यापीठाचे आभार मानले आहे.

विद्यापीठाच्या प्रशिक्षण व रोजगार सेलकडे आजपर्यंत एकूण ७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ३ हजार ६५८ या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विद्यापीठ शैक्षणिक परिसर आणि दीक्षांत सभागृह येथे आतापर्यंत २४ कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये ३१२ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. नागपूर येथे जॉब फेअर अंतर्गत १४ कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या त्यात ७२ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्या. वर्धा येथे आयोजित रोजगार मिळाव्यात १६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात २०० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. या सर्व विद्यार्थ्यांना दीड लाखांपासून ५ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

विद्यापीठाच्या प्रशिक्षण व रोजगार सेलअंतर्गत नापतोल ऑनलाइन शॉपिंग, सन-की सोलुशन ठाणे, हरियर इन्फॉर्मेशन सिस्टीम, नवभारत/ नवराष्ट्, हेक्झावेअर मिहान, जस्ट डायल, बीकॉन वेलकेअर प्रायव्हेट लिमिटेड, एक्झूड आमदाबाद, आरटीएमयू जॉब फेअर, टीसीएस नागपूर, ॲमेझॉन, वर्धा जॉब फेअर, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, बजाज अलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस ऍडव्हेल्स बॅंक, रिलायबल एनालिटिकल लॅब, इंडिया मार्ट पुणे आधी विविध कंपन्यांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांची निवड केली.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर विद्यापीठात क्रांतीज्योती स्मृतीदिन संपन्न 

Sat Mar 11 , 2023
क्रांतीज्योती च्या काळातील अत्याचाराचे स्वरूप बदलले : डॉ नीरज बोधी  नागपूर :-स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळातील स्त्री-पुरुष अत्याचाराचे स्वरूप बदलले परंतु अजूनही शूद्र अतीशुद्रावर आजही त्याच प्रकारचे अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने क्रांतीज्योती सारखे प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात खंबीरपणे उभे रहावे. असे आवाहन पाली पाकृत व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com