– ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ची बारामती कार्यकारिणी जाहीर
पुणे :- ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ ची बारामती कार्यकारिणी जाहीर झाली असून, बारामतीच्या अध्यक्षपदी अभ्यासू पत्रकार जितेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ यांनी जितेंद्र जाधव यांची निवड केली.
अल्पावधीत नावारूपाला आलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ या संघटनेने देशातील पत्रकारांची अव्वल संस्था म्हणून नाव लौकिक मिळवले आहे. कृतिशील कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’त आपला हिरीरीने सहभाग नोंदविला आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’ संघटनात्मक बांधणीचा महत्वाचा टप्पा म्हणून, उर्वरित शहरात आपल्या कामाची सुरुवात करीत आहे. याचाच एक भाग म्हणून बारामती कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली.
यात बारामतीचे अध्यक्ष म्हणून जितेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक तथा राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ यांनी नूतन अध्यक्षांचे स्वागत केले. जितेंद्र जाधव यांनी उर्वरित कार्यकारिणीची निवड करून घोषणा केली. ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्षपदी जावेद मुलानी, उपाध्यक्षपदी मंगेश कचरे, सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर रायते, खजिनदार नवनाथ बोरकर, कार्यवाहक म्हणून वसंत मोरे, संघटक म्हणून विकास कोकरे, प्रसिद्धीप्रमुख नवीन पठाण यांची नियुक्ती करण्यात आली, तर सदस्य म्हणून जयदीप भगत, जयकुमार जाधव, प्रशांत तुपे यांची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बारामतीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आगामी काळात पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. बारामती शाखेच्या वतीने लवकरच महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. या सर्व उपक्रमात सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवहान जितेंद्र जाधव यांनी केले आहे.