जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार

– उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव

मुंबई :- जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार आहे. यातून सुमारे साडे पंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने, या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत जिंदाल यांनी या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केला. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक चार दशलक्ष टन इतकी असणार आहे.

या उद्योग समुहाने आणि जिंदाल यांनी महाराष्ट्राच्या क्षमतेवर दाखविलेला विश्वास महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत नमूद केले.

याप्रसंगी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, जिंदाल समुहाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Fri Mar 28 , 2025
मुंबई :- विधानसभेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच शिवाजी पार्क येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!