नागपूर :-अरूण जोशी शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर येथे जीजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अचला तांबोळी यांनी जीजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. आपल्या भाषणात त्यांनी, स्त्रीशक्ती आणि तिचे राष्ट्रकार्यात योगदान यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद युवकाच्या जीवनात कसे मार्गदर्शक होऊ शकतात, तसेच आपले उद्दिष्ट निश्चित करून ध्येय्य गाठण्यासाठी कसे प्रयत्नरत राहायचे व यशाचे शिखर कसे गाठायचे यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन बी.एड. ची विद्यार्थीन्ी पल्लवी मेश्राम हिने केले तर योगेश भेंडारकर व दिपाली नन्नावरे या विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रगट केले. कार्यक्रमात आभार प्रदर्शन सचिन दिवाडकर यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. मेधा मोहरील, प्रा. भावना इंगळे, प्रा. अर्चना दुरगकर, प्रा. मिना घोष व मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.