यवतमाळ :- जिजाऊ शिक्षण महाविद्यालयातील छात्र अध्यापकांनी IQAC च्या उपक्रमा अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला.
यानिमित्त आदिवासी समाजाच्या जीवनावर भाषणाद्वारे प्रकाश टाकण्यात आले यामध्ये काजळ चारभे, अविनाश सुरपाम व वैष्णवी देशमुख यांनी आपला सहभाग नोंदवला. प्राचार्य सुनिल कावळे व naac समन्वयक प्राध्यापक डॉ. प्रकाश नागदेवते यांनी भावी शिक्षकांना आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून दिले यावेळी प्रा. योगेश प्रा. डॉ. मनीषा मूलकलवार, प्रा. सुरेंद्र राऊत, प्रा. निलेश भगत व प्रा. विजय देऊळकर आदी उपस्थिति होते. सूत्रसंचालन सौरभ राठोड व आभार प्रदर्शन प्रज्वल गोरे यांनी केले. यासाठी प्रतिक वासाडे, अजय बरदिया, प्रतीक्षा पांडे, शिवम डोईजड, अंशुमान दौलतकार, काजल डमभारे यांनी परिश्रम घेतले.