वाट्टेल ते बरळू लागला म्हणून जितेंद्राचा आधी प्रेम चोप्रा नंतर केश्तो मुखर्जी झाला 

किस्सा तसा फार जुना आहे पण एकदम सत्य आहे जो मला ‘ कोल्हाट्याचे पोर ‘ या आत्मचरित्र लिहीणार्या दिवंगत डॉ किशोर शांताबाई काळे यांनी स्वतः सांगितलेला आहे. डॉ किशोर यांची आई शांताबाई तमाशाच्या फडात नाचणारी आणि ठेवलेली बाई हे आत्मचरित्रात स्वतः किशोर यांनी लिहिलेले तरीही एकदा त्यांना थेट केबिन मध्ये बोलावून त्यावेळेच्या एका बौद्ध असलेल्या अतिशय प्रभावी असलेल्या आक्रमक आयुक्तांनी जेव्हा आईवरून छेडले काहीसे अश्लील विचारले तेव्हा डॉ किशोर यांनी त्या आयुक्तांची आई बहीण घेतली, तुम्हाला याक्षणी दोन थोबाडात ठेवून द्याव्यात असेही तो आयुक्तांना म्हणाला, डॉ किशोर यांचा तो रुद्रावतार बघून आयुक्तांची देखील फाटली. हा किस्सा खास आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी कि जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्याच्या भावनेला हात घालता तेव्हा राग अनावर होऊन संताप व्यक्त होतो जो राग तुम्ही विनाकारण किंवा त्या मुंब्र्यातल्या मुसलमानांना खुश करण्यासठी उगाचच ओढवून घेत आहात. आधी वाट्टेल ते बोलून मोकळे व्हायचे नंतर त्यावर सफाई देत फिरत राहायचे ज्याला अजिबात अर्थ नाही हे म्हणजे एखाद्या सुसंस्कृत तरुणीला डोळा मारण्यासारखे असते, डोळा मारायचाच कशाला, हे माहित असतांना कि डोळा मारल्यानंतर तिचा आडदांड भाऊ दंडुका हाती घेऊन मागे लागणार आहे. प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते हे तेही मोदी लाटेत आधी बोलायचे सांगायचे जेव्हा प्रकरण अंगाशी आले त्यावर माफी मागून गप बसायचे असे न करता जेव्हा उगाचच ग दि माडगूळकर ह्यांच्या गीत रामायणातील ओळींचे आणि वाल्मिकी यांच्या रामायणातील संदर्भ किंवा पुरावे देऊन, अप्रत्यक्ष पुन्हा तेच सांगायचे किंवा सिद्ध करण्याचा आटापिटा करायचा कि प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते…

तुम्हा आम्हा सर्वांना हे माहित आहे शरद पवार यांना अगदी नियमित मद्य प्राशन करायला आवडते तरीही उद्या समजा एखाद्याने शरद पवार हे बेवडे आहेत, असे म्हणण्याचा अवकाश, आव्हाड तुम्ही या पद्धतीने बोलणार्यावर जरी समोरचा बोलणारा कितीही शक्तिमान ताकदवान असला तरीही तुम्ही दात ओठ खात त्या व्यक्तीवर धावून जाल, हातात जे सापडेल त्याने त्याला बडवून काढाल,किंबहुना तुम्ही काय पण पवारांच्या विरोधातले देखील बोलणार्यावर नक्की तुटून पडतील नेमके हेच प्रभू रामचंदाच्या बाबतीत घडले आणि येथे तर तुम्ही थेट तुमच्या आमच्या साऱ्यांच्या देवा विषयी थेट परमेश्वराविषयी बोलला आहेत बरळला आहात आणि तेही नेमके पूर्णतः शुद्धीवर असतांना. मित्रहो, त्या ठाण्यात अगदी सुरुवातीपासून या आव्हाडांचे नावडत्या सवतीच्या पोरा सारखे झालेले आहे म्हणजे जितेंद्र आव्हाड अगदी राजकारणात आल्या दिवसापासून त्यांची अवस्था अख्ख्या ठाणे जिल्ह्यात टाकून दिलेल्या आणि एकटी राहणाऱ्या उफाड्या देखण्या तरुणीसरखी झालेली आहे, जेव्हा एखाद्या या अशा टाकून दिलेल्या तरूणीला ऐन संकटात जो धावून येतो तिला आपल्या बाहुपाशात घेऊन आधी पाठीशी उभा राहतो नंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेच नेमके आव्हाडांचे झाले आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यातले त्यांच्या पक्षातले आणि विरोधी पक्षातले जेव्हा एकाचवेळी सारेच्या सारे तुटून पडत होते तेव्हा आधी एकमेव शरद पवार त्यांच्यासाठी धावून यायचे त्यानंतर जेव्हा याच आव्हाडांना आमदार व्हायचे होते तेव्हा मुंब्र्यातले मुसलमान याच आव्हाडांना मनापासून सहकार्य मतदान करून मोकळे झाल्याने पवार आणि मुंब्र्यातल्या मुसलमानांना सदैव सतत खुश ठेवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यापद्धतीने दरवेळी हिंदू दुखावतील पद्धतीने बोलून मोकळे होतात ज्याचा त्यांना आज राजकीय फायदा दिसत असला तरी फार मोठी किंमत एक दिवस नक्कीच त्यांना मोजावी लागणार आहे…

जितेंद्र आव्हाड यांचा एकेकाळचा सर्वाधिक जवळचा मित्र प्रताप सरनाईक त्यांना सोडून गेला वरून सरनाईकांनी त्यांना खूप बदनाम केला त्रास दिला त्यानंतर याच आव्हाडांच्या राष्ट्रवादी पक्षातले एकेकाळचे ठाणे जिल्ह्यातले ताकदवान नेते गणेश नाईक आणि वसंत डावखरे किंवा या दोघांचे राजकारणातले मुले व पाठीराखे कायम आजतागायत आव्हाडांना डोकेदुखी ठरले आहेत किंवा जर मातोश्रीवरून याच आव्हाडांना सांभाळून घ्या असे सतत निरोप जर उद्धव ठाकरे यांच्याकडून आधी आनंद दिघे त्यानंतर एकनाथ शिंदे यांना ते उद्धव सेनेत असतांना आले नसते तर नक्कीच एखाद्या भडकू माथ्याच्या शिवसैनिकाने आव्हाडांच्या डोक्यात मोठा दगड घातला असता किंवा एकनाथ शिंदे यांनी वेगळ्या पद्धतीने बदला घेतला असता एवढी प्रचंड नफरत त्यांच्याविषयी ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यांच्या मनात आहे ….

एवढेच काय याच जितेंद्र आव्हाड यांना सर्वाधिक पाण्यात पाहणारा त्यांचा एकेकाळचा नेता म्हणजे अजितदादा पवार, केवळ काका आव्हाडांच्या भक्कम पाठीशी असल्याने त्या अजितदादा यांना हात चोळत बसण्यापलीकडे काहीही कधीही हातात उरलेले नव्हते म्हणूनच आव्हाडांनी प्रभू रामचंद्राविषयी अनुद्गार काढताच सर्वप्रथम त्यांचा मोठ्या जमावाने ठाण्यात धिक्कार केला ते सारे भाजपाचे नव्हे तर अजित पवार यांचे समर्थक होते. नाही म्हणायला फडणवीसांच्या मनात याच आव्हाड यांच्याविषयी नक्कीच सहानुभूती होती जी यावेळी आव्हाड पूर्णतः गमावून बसले आहेत म्हणजे यापुढे थकलेले संपलेले जर्जर झालेले शरद पवार आणि आश्चर्य म्हणजे याच आव्हाडांपासून यादिवसात त्यांच्यापासून दूर गेलेले कळवा मुंब्र्यातले बहुसंख्य मतदार, आव्हाडांसाठी येणारी प्रत्येक रात्र वैऱ्याची आहे त्यांनी सावध वागावे सावध बोलावे देखील…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे “पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024” चे आयोजन

Fri Jan 5 , 2024
– “शाश्वत विकासासाठी बांबू लागवडीचे महत्त्व” याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मुंबई :- पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी वसुंधरा अभियान, फोनिक्स फाउंडेशन संस्था आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून ही परिषद यशवंतराव चव्हाण केंद्र येथे होणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!