जायकवाडी फ्लोटिंग सोलारसह कन्व्हेन्शन सेंटर,ओव्हर ब्रीजच्या कामास गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलार, डी.एम.आय.सी.मध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, वाळूज ते शेंद्रा ओव्हर ब्रीज या कामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेऊन,या विकासकामांना गती द्यावी अशा सूचनाही यावेळी दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील विकास कामांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये सहयाद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित(एनटीपीसीचे) व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव(रस्ते) साळुंके, डॉ.कराड यांचे खासगी सचिव अमित मीना, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पैठण येथील जायकवाडी धरणावर बाराशे मेगावॉट ऊर्जा निर्मितीचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येईल.

तसेच पक्षी अभयारण्य आणि पर्यावरणाबाबत सर्वेक्षणासाठी तातडीने एजन्सी नियुक्त करून पर्यावरण, स्थानिक पातळीवरील अडचणी पक्षी अभयारण्य, आरक्षण याबाबत सर्वेक्षण करून घ्यावे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. त्यानंतर हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. याबाबतच्या पर्यावरण विषयक परवानगी संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.

छत्रपती संभाजीनगर शहराचा सध्या होत असलेला विस्तार, वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जालना रोडवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहत फ्लाय ओव्हर ब्रीज याबाबत माहिती घेऊन हे विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नेपाळमधील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

Fri Dec 1 , 2023
मुंबई :- नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध आणखी दृढ करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत व नेपाळ यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणाऱ्या काठमांडू येथील भारत-नेपाळ फ्रेंडशीप सोसायटीच्या फ्री यूथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com