जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकाबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई :- हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक अॅथलेटिक्सचे पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

2021 च्या टोकियो ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदका नंतर, जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा देणारी, देशातील तरुण पिढीला खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीचे कौतुक करुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदके मिळाली आहेत. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरजने रौप्यपदक जिंकले होते. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून नीरजने देशासाठी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतलं पदकांचं वर्तुळ पूर्ण केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्णकामगिरी बद्दल आनंद व्यक्त केला.

याच स्पर्धेत भालाफेकपटू किशोर जाना याने 84.77 मीटर भालाफेक करून पाचवे स्थान मिळविले आहे. भालाफेकपटू डी.पी. मनू याने 84.14 मीटरपर्यंत भालाफेक करून सहावे स्थान मिळविले आहे. या दोघांचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कौतुक केले असून भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासींचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवायचा आहे - केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी 

Mon Aug 28 , 2023
– एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप नागपूर :-  देशातील सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करण्याची, विशेषत्वाने आदिवासी, मागास लोकांच्या जीवनात परिवर्तन होऊन ते चांगले जीवन कसे जगतील, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था त्याच प्रयत्नांवर २७ वर्षे कार्य करीत आहे. शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणे आणि त्यांच्या जीवनाचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ (सुखांक) वाढविण्याचा निर्धार आम्ही केला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com