बेला :- वार्ड नं.3 मधील पोतले मोहल्यातील संत कोलबास्वामी देवस्थानात प्रथा, परंपरेनुसार यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी धार्मिक व आनंदी वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने चिमुकल्या मुला, मुलींना राधा कृष्णाच्या वेशभूषेत दिंडी यात्रेने गावातून फिरवण्यात आले. त्यास असंख्य दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील तीनही मोहल्यातील आदिवासी हलबा,कोष्टी विणकर समाज बांधव या जन्माष्टमी उत्सवाचे गोपालकाला व महाप्रसादाचा गुण्यागोविंदाने लाभ घेतात. शेकडो वर्षापासूनची ही परंपरा आजही बेला येथे अबाधित आहे. हे येथे विशेष उल्लेखनीय.
कोलबास्वामी देवस्थानात जन्माष्टमी उत्साहात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com