जलालखेडा पोलीसांची अवैध्य वाळु माफिया विरूद्ध धडाकेबाज कार्यवाही

जलालखेडा :-पो.स्टे. हद्दीत अवैध्य वाळु वाहतुकीवर आळा घालण्या करीता सी.बी. चौहान ठाणेदार जलालखेडा यांचे पथक PSI/ शेंडे, PSI/ रामटेके, पोलीस अंमलदार पुरूषोत्तम काकडे, निलेश खरडे, फिरोज शेख, जाकीर शेख, आशिष हिरूळकर, दिनेश जोगेकर, शिवदास सौंदळे, किशोर कांडेलकर, व चालक रविंद्र मोहोड सह पेट्रोलिंग करीत असतांना विश्वसनिय गोपनिय मुखबिराद्वारे माहीती मिळाली कि, ग्राम भिष्णूर परिसरामध्ये जाम नदी पात्रामधून १) किशोर व्यंकटराव चरडे वय ५७ वर्ष रा. भिष्णूर २) कैलास शेषराव कळंबे वय ३४ वर्ष रा. भिष्णूर हे व्यक्ति अवैध्यत्यिा वाळु वाहतुक करित आहे. अशा माहीती वरून स्टाफसह जाम नदीपात्रात लपत छपत जावून पाळत ठेवली असता, जाम नदी पात्रातून भिष्णूर रोडवर ०२ ट्रॅक्टर येतांना दिसले स्टाफच्या मदतीने सदरचे ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरमध्ये पाहणी केली असता रेती आढळून आली रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगीतले वरूण सदरचे दोन्ही ट्रॅक्टर क्रमांक १) MH 40 A-1646 व ट्रॉली MH 40 A/2711 मध्ये अंदाजे ०१ ब्रास वाळू/रेती किंमत ५०००/- रु. व स्वराज कंपणीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह किंमत ५,००,०००/- रु. २) MH 40 TCD-01 व ट्रॉली MH 40 CQ-6579 मध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू/रेती किंमत २,५००/- रू. व जॉन्डीयर कंपणीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह किंमती ६,००,०००/- रू. असा एकुण ११,०७,५००/- रू. चा. माल आरोपीचे ताब्यातून जप्त करूण ठाणेदार सा. यांचे आदेशाने पो. स्टेला. गु.१.नं. २५१/२०२४ कलम ३७९ भार्दवी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधि. सहकलम ४, २१ खाण आणि खणिज अधि. सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि. अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील आरोपी पोस्टेला अटक करण्यात आले आहे.

तसेच पेट्रोलिंग करीत असतांना विश्वसनिय गोपनिय मुखविराद्गारे माहीती मिळाली कि, अवलीया बाबा दर्गाह, मसली फाटा भिष्णूर जवळ एक आकाशी रंगाचे वाळु/रेतीने भरलेला ट्रक येत आहे अशा माहीती वरून सदर ठीकाणी स्टाफसह गेले व स्टाफच्या मदतीने सदरचा टूक थांबवीला असता, सदर ट्रकचा क्रमांक MH 40 BG-5524 सदर टूक मध्ये पाहणी केली असता वाळु मिळून आली चालक नामे किशोर सिताराम कुंभरे वय ३५ वर्ष रा. डोंगरगाव यास रॉयल्टी बावत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगीतले सदर ट्रक मध्ये अंदाजे ०५ ब्रास वाळु/रेती किंमत २५,०००/- रू. व टाटा कंपणीचा टिप्पर ट्रक किंमत २०,००,०००/- रू. असा एकूण २०,२५,०००/- रू. चा. माल आरोपीचे ताब्यातून जप्त करूण ट्रक मालक मंगेश मारोतराव देव्हारे वय ३८ वर्ष रा. झिल्पा ता. काटोल यांचे मालकीचा असून, सदर ट्रकचा चालक नामे किशोर सिताराम कुंभरे वय ३५ वर्ष रा. डोंगरगाव व मालक मंगेश मारोतराव देव्हारे वय ३८ वर्ष रा. झिल्पा ता. काटोल यांचे विरूद्ध ठाणेदार सा. यांचे आदेशाने पो. स्टेला. गु.र.नं. २५२/२४ कलम ३७९, १०९ भादंवी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधि. सहकलम ४, २१ खाण आणि खणिज अधि, सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि अन्वये गुन्हा नोंद गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील आरोपी पोस्टेला अटक करण्यात आले आहे. सदरचे दोन्ही गुन्हह्यांमध्ये असा एकुण ३१,३२,५००/- रू. चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, बापू रोहोम उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल यांचे मार्गदर्शनाखाली जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सी.बी. चौहान, PSI/ शेंडे, PSI/ रामटेके, पोलीस अंमलदार पुरूषोत्तम काकडे, निलेश खरडे, फिरोज शेख, जाकीर शेख, आशिष हिरूळकर, दिनेश जोगेकर, शिवदास सौंदळे, किशोर कांडेलकर, व चालक रविंद्र मोहोड यांचे मदतीने करण्यात आलेली आहे.

गुन्हयांचा तपास ठाणेदार सपोनि सी. बी. चौहान यांचे मार्गदशर्नात पोहवा पुरूषोत्तम काकडे व पोना दिनेश जोगेकर हे करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान व हानी टाळण्यासाठी नागपूर ग्रामीण जिल्हया अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांना S.D.R.F टीम मार्फत प्रशिक्षण

Wed May 29 , 2024
नागपूर :- दिनांक २८/०५/२०२४ चे ०९/३० वा. ते १२/०० वा. येणाऱ्या पावसाळयात अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान व हानी टाळण्यासाठी आज रोजी पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत मौजा उमरी गावात उमरी डॅम शिवतीर्थ वॉटर पार्क अँड टुरिज्ञाम येथे शोध व बचाव पथक SD.R.F. टीम मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण मध्ये उपस्थित मां. DYSP सोनटक्के. PI ०१, PSI ०१, १० कर्मचारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com