स्व. रा. पै. समर्थ (गुरुजी) प्रतिमा अनावरण आणि जैन कलार समाज न्यास देणगीदार सत्कार समारंभ 

नागपुर – जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ (केंद्रीय व जिल्हा समिती) च्या वतीने जैन कलार समाजभवन, रेशीमबाग, नागपूर येथे स्वातंत्रता संग्राम सेनानी, माजी आमदार, माजी महापौर व समाज भूषण स्व. रा. पै. समर्थ (गुरुजी) यांच्या अर्धाकृती प्रतिमेचे अनावरण आणि जैन कलार समाज न्यासात नमूद असलेले सर्व मा. देणगीदारांचा सत्कार समारंभ यशस्वीपणे आयोजित केले.
मा. श्री. यादवराव शिरपूरकर (माजी अध्यक्ष-जैन कलार समाज) यांच्या शुभहस्ते आणि समारंभ अध्यक्ष :- मा. श्री. अनिल अहिरकर (अध्यक्ष-जैन कलार समाज), मा. श्री. रविकांत पंढरीनाथ हरडे (जिल्हा समिती अध्यक्ष-जैन कलार समाज), रा. पै. समर्थ स्मारक समिती मंडळ, मा. श्री. चंद्रशेखर विठोबाजी आदमने, मा. श्री. कार्तिक एकनाथजी शेंडे, मा. श्री. शशिकांत वामनराव समर्थ, मा. श्री. विनोद रामचंद्रजी खानोरकर, मा. श्री. अनिल गणपतराव आदमने, मा. डॉ. श्री. अमोल राजेंद्र समर्थ, मा. श्री. स्वप्निल मदन समर्थ, सर्व मा. पदाधिकारी व विश्वस्त जैन कलार समाज न्यास (केंद्रीय व जिल्हा समिती) यांच्या विषेश उपस्थितीत प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. व त्यानंतर आर्थिक स्वरूपात जैन कलार समाज न्यासाला देणगी देत बळकटी देणाऱ्या सर्व देणगीदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच रा. पै. समर्थ प्रतिमेचे शिल्पकार मा. श्री. हर्षवर्धन आनंदराव इंगोले व सहयोगी मा. श्री. लक्ष्मीकांत चंद्रकांत पेशने यांचा विशेष सत्कार शाल, श्रीफळ, पुष्प आणि सन्मानचिन्हाने करण्यात आला व रा. पै. समर्थ जीवनी माहिती संकलन करून लिखाण करणारे श्री. रविशंकर कोलते आणि श्री. दत्तात्रय हरडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्रीमती रामभाऊ डोर्लीकर, श्रीमती राजश्री राजेंद्र समर्थ, श्रीमती आशा मदन समर्थ, सर्वश्री विश्वास क्षिरसागर, मोरेश्वर मानापुरे, कृष्णा खानोरकर, मोहन समर्थ, संजय खानोरकर, प्रितम समर्थ, संदीप खंगार, सुबोध पेशने, राजेंद्र वारजूरकर, प्रदीप पलांदूरकर, रोहन खानोरकर, चंद्रशेखर तिडके, विनोद खेडीकर, गणेश दुरुगकर, श्रीकांत शिवणकर, प्रमोद पलांदूरकर, कमलेश समर्थ, संजय शिरपूरकर, मिलिंद मानापुरे, विजय मुरकुटे, मनोज आष्टीकर व समाजातील अनेक गणमान्य बंधू-भगिनींच्या उपस्तिथी दर्शविली.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

संपूर्ण जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

Mon Dec 13 , 2021
भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव, एस. टी. महामंडळाचे राज्यव्यापी संप व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात 14 ते 28 डिसेंबर 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत पुढीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले असून यात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com