नागपूर :- एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनीक जीवनातुन भ्रष्टाचाराचे समुळ निर्मुलन करण्याची घोषणा वारंवार करीत आहेत मात्र महाराष्ट्रातील भाजप निर्मित खोकेबाज सरकारमध्ये राजरोसपणे सुरु असलेला भ्रष्टाचार त्यांच्या भ्रष्ट महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार ) गटाने महाजनको महासंचालक यांना सादर केलेल्या अभ्यासपुर्ण तक्रारीमध्ये केला आहे .सध्या घटक पक्षापेक्षा नौकारशाहीला हाताशी घेऊन भाजपाच्या मंत्र्यांनी कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार सुरु केल्याची ही तक्रार असुन या तक्रारीला केराची टोपली दाखविल्याने त्यांना ही तक्रार शिवसेना (उबाठा ) प्रवक्ते किशोर तिवारी यांच्याकडे पाठविली आहे व आपण ही तक्रारीची संपूर्ण चौकशीच भारताला भ्रष्टाचार मुक्त करणारे विश्वगुरू प्रभु पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविली असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी नागपूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली.
सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रियदर्षन अजय इंगळे यांनी ६/५/२४ ला आपल्या सहीनिशी महाजनको च्या महासंचालकास मुद्देसूद माहीती चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रा मधील राजरोसपणे सुरु असलेला भ्रष्टाचार चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यासाठी सादर केल्यानंतरही चंद्रपूर भाजपा नेत्याच्या दबाबाखाली स्थानीय अडाणी झालेल्या एका कंत्राटदाराने जो नंगानाज सुरु ठेवला आहे यामध्ये ऊर्जा सचिव ,महासंचालक व एक महाजनको संचालक सक्रीय सहभागी असुन यांची एस आई टी लावून चौकशी करने काळाजी गरज झाली आहे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस(अजीत पवार ) गटाच्या प्रियदर्षन अजय इंगळे यांनी आपल्या सहीसह सादर केलेल्या तक्रारीत योग्य कारवाईची मागणी करीत म्हटले आहे की
विषय:- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रा मधील मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीने केलेल्या कामाच्या व सुरू असलेल्या कामाच्या निविदेमध्ये व कामामध्ये झालेल्या गैरव्यवहार व या भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्या गिरीष कुमरवार, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर व कंत्राटदार कंपनीवर योग्य कार्यवाही करण्याबाबत.
मा. महोदय,
सेवेंषी नम्र विनंती आहे की, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मोठया प्रमाणात अनेक कामे कंत्राटदारामार्फत केली जातात. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मेसर्स रणजितसिंग सलूजा या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे व सद्यस्थिती मध्ये अनेक कामे सुरू आहेत.
मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीने केलेल्या अनेक कामाच्या निविदा मध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. सन २०२३ पासून मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीने केलेल्या कामाची व सध्या सुरू असलेल्या कामाची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे.
दि. ०८/०५/२०२३ रोजी काम काढून मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीस दिले. परत तेच काम सहा महिन्यानंतर मुख्य अभियंता यांनी काढून मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीस P.O. No. : CSTPS/4500129665 किंमत रू. ०२,२९,३९,२००.००/- दि ०४/११/२०२३ ला दिले. तसेच चंद्रपूर महाओष्णिक विद्युत निर्मिती केन्दा्रमधील CHP-D (Coal Handling Plant–D) येथे मुख्य अभियंता यांनी P.O. No. CSTPS/4550019160 किंमत रू. ०२,२९,३९,२००.००/- दि ०६/०७/२०२३ रोजी काम काढून मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीस दिले तेच काम सहा महिन्यानंतर P.O. No. CSTPS/4500130337 किंमत रू ०२,२९,३९,२००.००/- दि. १८/१२/२०२३ व्दारा काढून मेसर्स रणजितसिंग सलूजा या कंत्राटदार कंपनीस दिले.
मा. महोदय, गंगंभीर बाब अशी की, मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनी CHP-D (Coal Handling Plant -D) च्या AMC (Annual Maintenance Contract) करीता एकुण रू. ०९,६४,४६,७१६.०० चा Purchase Order No. 4500128602 दिनांक २५/१०/२०२३ रोजी मुख्य अभियंता यांच्याकडून देण्यात आला आहे.
मेसर्स रणविजयसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीने चंद्रपूर महाऔश्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपूर मध्ये सर्व काम 0% AT PAR,3% ABOVE PAR, 5% ABOVE PAR, 9% ABOVE PAR या दराने घेतली आहे. महाजनको निविदा प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा झालेली नाही. निविदा प्रक्रियेमध्ये दिलेल्या मंजुर दरापेक्षा जास्त रक्कमेने निविदा कंत्राटदारास देण्यात आलेल्या आहे. चढत्या दराने निविदा कंत्राटदारास देण्यात आल्यामुळे महाजनको (महाराश्ट्र षासनाचा उपक्रम) यांना मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हे एका प्रकारे मुख्य अभियंता व कंत्राटदार या दोघांनी मिळून जनतेने कराच्या रूपात षासनाकडे जमा केलेल्या पैष्यावर डाका घालण्यासारखे आहे.
ही सर्व कामे दि. १८/०५/२०२३ ते दि. ०३/०२/२०२४ या कालावधी मधील आहेत.
गिरीष कुमरवार (सध्या कार्यरत मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔश्णिक विद्युत निर्मीत केंद्र चंद्रपूर) हे आधी मध्यवर्ती खरेदी विभाग (CPA) महाजनको, प्रकाषगड, मुंबई येथे मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते. त्यांची चंद्रपूर महाऔश्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मुख्य अभियंता या पदावर बदली दि. १०/०५/२०२३ रोजी झाली. त्यांनी मुख्य अभियंता या पदाचा पदभार स्विकारताच काही निवडक कंत्राटदार कंपन्या (ज्यामध्ये प्रामुख्याने मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीचा समावेष आहे.) यांना मोठया प्रमाणात कामाच्या निविदा मध्ये आपल्या पदाचा दुरूपयोग करून व आर्थिक देवाण- घेवाण करून मेसर्स रणजितसिंग सलूजा या कंत्राटदार कंपनीला एकुण २७ कामे दिली आहे. त्या कामाची रक्कम रूपये ६२,०१,३०,९१६.०० (अक्षरी बासश्ट करोड एक लाख तीस हजार नवषे सोळा रूपये) इतकी आहे.
गिरीष कुमरवार मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔश्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर यांनी मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीला चंद्रपूर महाऔश्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये CHP-A (Coal Handling Plant-A) येथे P.O. No. CSTPS/450027061 किंमत रू. ७१,८०,६३०/- दिनांक २४/०६/२०२३ रोजी काम दिले तेच काम श्री गिरीष कुमरवार मुख्य अभियंता, चंद्रपूर यंानी सहा महिन्यानंतर परत त्याच कंत्राटदारास P.O. No. CSTPS/4500130459 किंमत रू. ७०,८२,२६६/- दिनांक २०/१२/२०२३ रोजी दिले.
अषाच प्रकारे महाऔश्णिक विद्युत केंद्रामधील ब्भ्च्.। CHP-A (Coal Handling Plant -A CHP-A (Coal Handling Plant–A) मध्ये P.O. No. CSTPS/4500126098 किंमत रू. ०२,२९,३९,२००.००/- वरील सर्व बाबी लक्षात घेता, गिरीष कुमरवार मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔश्णिक विद्युत निर्मीती केंद्र, चंद्रपूर यांनी आपली बदली मुंबई वरून चंद्रपूर ला करून मेसर्स रणजितसींग सलुजा या कंत्राटदार कंपनीला मोठया प्रमाणात (करोडो रूपयात) कामे देण्याकरीता केली. मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीला देण्यात आलेल्या ०२ करोड ते २.५०करोड रूपये ची कामे अर्धवट ठेवून पूर्ण बिलांची उचल करण्यास श्री गिरीष कुमरवार मुख्य अभियंता यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपल्या पदाच्या अधिकारककाचा गैरवापर करून बिलाच्या रक्कमेची उचल करण्यास मदत केली आहे.
आपणास विनंती करण्यात येते की, आपण या प्रकरणात गांभिर्यपूर्वक लक्ष देवून चंद्रपूर महाऔश्णिक केंद्रांवर निर्मिती केंद्र, चंद्रपूर मधील मेसर्स रणजितसिंग सलुजा या कंत्राटदार कंपनीने केलेल्या कामाची व सुरू असलेल्या कामाच्या निविदे मध्ये झालेल्या गैरव्यवहार व या भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्या श्री गिरीष कुमरवार मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔश्णिक विद्युत निर्मीती केंद्र, चंद्रपूर व कंत्राटदार कंपनीवर चौकशी करून योग्य कार्यवाही करावी.
ऊर्जा विभागात ऊर्जा सचिव सह चांडाळ चौकडीची संपत्तीची चौकशी करा
महाराष्ट्रातील सर्व वीज निर्मिती केंद्रावर अडाणीचे नियंत्रण आले असुन सर्व नियम धाब्यावर राजरोसपणे भ्रष्टाचार होत आहे .ऊर्जा मंत्र्यांनी आपले अत्यंत जवळचे खासम खास संचालक म्हणुन नियुक्त केले आहे व तेच कोळसा व कंत्राट पाहतात . महाऔश्णिक विद्युत निर्मीती केंद्रांवर पुरवडा करणाऱ्या तसेच कंत्राट घेणाऱ्यांची टोळी सक्रिय असुन पालकमंत्रांचा हिस्सा देण्याचे काम भाजपाच्या पूर्णकालीन नेत्यांवर संचालक नियुक्त करून देण्यात आले आहे अशा परिस्थितीचा फायदा ऊर्जाविभागात पती पत्नी असणाऱ्या सनदी अधिकाऱ्याने राजरोसपणे सुरु केला असुन येत्या तीन महिन्यात कमीत कमी शेकडो कोटींचा चुना महाराष्ट्राला ऊर्जा मंत्रालयातील सनातनी भ्रष्ट अधिकारी लावतील म्हणुन आपण भ्रष्टाचार मुक्त करणारे विश्वगुरू प्रभु पंतप्रधान नरेंद्र मोदींना याचीका केल्याची बातमी किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .