मुंबई – पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रेसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व मार्गावरील राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाचा पथकर माफ करण्यात यावा. सर्व पथकर नाक्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचना पोहोचल्या आहेत का याची खात्री संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, परिवहन विभाग अधिकारी यांनी करावी. वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकर आकारण्याबाबत कसल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांनी सविस्तर माहिती दिली. सवलत देण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी मिळेल याची खात्री करावी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com