संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-भाजीपाला बियाणे पेरणी कार्यशाळा
कामठी :- आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी मुलांना शिक्षणाची कास दिली जाते मात्र शाळेत विद्यार्थ्यांना प्राथमिक पासूनच शालेय शिक्षणासह शेती विषयक अभ्यास व शेतीचे अनुभव करून द्यावे असे मौलिक प्रतिपादन वात्सल्य प्रिस्कुल शाळेच्या डायरेक्टर स्वाती साबळे यांनी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्रोफेसर कॉलोनी रणाळा येथील वात्सल्य प्रीस्कुल शाळेत आयोजित एक दिवसीय भाजीपाला बियाणे पेरणी कार्यशाळा कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यशाळेत शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तसेच शाळेचे डायरेक्टर स्वाती साबळे यांनीही सहभाग नोंदविला होता. दरम्यान त्यानी भाजीपाला बियाणे पेरणी वर मौलिक असे मार्गदर्शन केले.तसेच एक एक विद्यार्थ्यांने एका कुंडलीत भाजीपाला बियाणे पेरण्याचा अनुभव घेतला तसेच शाळेतील शिक्षिका विना यांनी या कार्यशाळेचे महत्व विषद केले. या कार्यशाळेत सर्व विद्यार्थ्यांत मोठा उत्साह दिसुन आला होता.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वात्सल्य प्रिस्कुल शाळेच्या डायरेक्टर स्वाती साबळे तसेच शाळेतील शिक्षक आश्लेषा मेश्राम, विना नायडू,रिता चरबे,स्वाती कावळे,पूजा पाखमोडे ,शिक्षकवृंद कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोलाची भूमिका साकारली