येरखेड्यात इसमाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथे काल 11 मे ला सकाळी 8 वाजता यशोदा शाहू नामक 28 वर्षीय नवविवाहित महिलेने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडण्याला विराम मिळत नाही तोच आज येरखेडा येथील बर्फ कंपनीच्या मागे राहणाऱ्या लांजेवार कुटूंबातील 60 वर्षोय इसमाने घरात कुणी नसल्याचे संधी साधुन राहत्या घरातील छताला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे अकरा दरम्यान घडली असून मृतकाचे नाव राजेंद्र शंकर लांजेवार वय 60 वर्षे असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाच्या घरातील इतर घरमंडळी कामानिमित्त घरा बाहेर असल्याने घरात कुणी नसल्याचे संधी साधून मृतकाने अज्ञात कारणांवरून गळफास लावून आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतकाच्या पार्थिवावर श्वविच्छेदनगृहात शविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी यासंदर्भात तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही.मृतकाच्या पाठीमागे पत्नी ,दोन मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अक्षय तृतीया पर वर्धमान नगर से निकली शोभायात्रा

Mon May 13 , 2024
– राधा कृष्ण मंदिर ने 47वें स्थापना दिवस पर मनाया पाटोत्सव नागपुर :- वर्धमान नगर के राधा कृष्ण मंदिर के 47 वें स्थापना दिवस पर अक्षय तृतीया को भव्य शोभायात्रा निकाल कर पाटोत्सव धूमधाम से मनाया गया। इस अवसर पर शोभायात्रा में अनेक भक्त शामिल हुए। मैनेजिंग ट्रस्टी पवन पोद्दार ने बताया कि पूरे मंदिर परिसर को फूलों, केले के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com