नागपूर :-आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए. सी. भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे प्रिय शिष्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात अन्नामृत फाउंडेशन नागपूरद्वारे सिम्स हॉस्पिटल, बजाज नगर प्रांगणात जनरल वॉर्डच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नियमितपणे भोजन वितरण कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. रामानुज नगर, कळमना मार्केट, भरतवाडा रोड येथे निर्मित श्रीमती स्वर्णलता आणि श्री गोविंद दासजी सराफ (तुमसरवाले) सेंट्रलाइज्ड किचनमध्ये विविध दानशूरांच्या सहकार्याने भोजन तयार केले जात आहे.
कार्यक्रमात सुरुवातीला व्हीआयएचे माजी अध्यक्ष आणि सिम्स हॉस्पिटलचे चेअरमन प्रवीण तापडिया यांनी मुख्य अतिथी माजी खासदार आणि एसएमएसचे चेयरमन अजय संचेती, विशेष अतिथी भारतीय जीवन विमा निगमचे निवृत्त कार्यकारी संचालक निलेश साठे आणि अन्नामृत फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर शर्मा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सिम्सचे व्हाईस चेअरमन अनिल पारख, सचिव मुकेश अग्रवाल, संजय राठी, विजय उमेश शर्मा, जी. एम. जवंजाळ, अध्यक्ष डॉ. लोकेंद्र सिंह, उपाध्यक्ष डॉ. विजय अग्रवाल, डॉ. नितीन चांडक, डॉ. निरज बाहेती, डॉ. शिरीष देशपांडे, डॉ. संजीवनी केळकर, डॉ. पंकज सारडा या विश्वस्त आणि डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभले.
सिम्स व्यवस्थापनाने रुग्णालयाच्या परिसरात भोजन वितरण कक्षाची स्थापना केली आहे. अजय संचेती यांनी सर्व अतिथींच्या उपस्थितीत फित कापून आणि नारळ फोडून भोजन वितरण कक्षाचे विधिवत उद्घाटन केले. यावेळी अन्नामृत फाउंडेशन नागपूरचे व्यवस्थापक राजेंद्रन रामन, संचालकद्वय भगीरथ दास आणि प्रवीण साहनी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अतिथींनी भोजन वितरण केंद्रातून रुग्णांसोबत आलेल्या शेकडो लोकांना भोजन वितरित केले. यात सिम्सचे विश्वस्त व डॉक्टरांनी सहकार्य केले. याप्रसंगी डॉ. मधुसूदन सारडा, अनिल सारडा, नागेश जैन, महेश लाहोटी, महेश झाडे पाटील, सुभाष लाहोटी, रमाशंकर अग्रवाल, रामानुज असावा (कंपनी सेक्रेटरी), अनिल भागडीकर, के. व्ही. सुरेश, विवेक देशपांडे, विनोद अग्रवाल, एड. सुरेश मेहाडिया, रिमाचंद कालेजी (इन्फोसेप्ट्स फाउंडेशन), गिरीश कोठारी (C.S.), सत्यनारायण शर्मा, नंदकिशोर प्रभु इत्यादींचा सहभाग होता.