हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेतकऱ्यांचे की, उद्योगपती चे ? 

-आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतकऱ्यांना पोलीसांनी रात्री पकडुन नगरपरिषदेत कोबुन ठेवले. 

कन्हान : – महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. (गुप्ता़) कोल वॉशरीच्या प्रदुषणाने त्रस्त वराड़ा, वाघोली, एसंबा घाटरोहणा व गोंडेगावच्या शेतकऱ्याचे आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतकऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान यानी मध्यरात्री पकडुन कन्हान पोलीस स्टेशनला नेऊन नविन नगरपरिषदेत कोबुन ठेवल्याने संप्तत सरपंचा विद्या चिखले सह परिसरातील सरपंच, ग्रा.प.सदस्य, राजकीय मंडळी व शेतकऱ्यांनी दिवसभर कन्हान पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करून एक तर शेतकऱ्यांवर किंवा कम्पनी वर गुन्हा दाखल करून कोल वासरी बंद करण्याची मागणी केल्याने 17 तासा नंतर कन्हान थानेदार विलास काळे हयानी 68 ची कार्यवाई करून सायंकाळी आंदोलनकारी शेतक-यांना वराडा गावात नेऊन सोडण्यात आले.

पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि.कोल वाशरीचा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आला. या कोल वॉशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खुली खदान व इतर खदान येथुन येणाऱ्या कोळस्याला वॉश करण्यात येत असल्याने उडणाऱ्या कोळसा धुळी मुळे वायु आणि जल प्रदुषणाने वराडा, वाघोली, एंसबा, घाटरोहणा व गोंडेगाव येथील ६०० एकरावर शेती पिक प्रदुषित होत नुकसान होत आहे. कोळसा धुर मिश्रीत पाण्यामुळे जमिनीचे पाणी ही प्रदुषित झाले आहे. धुळकणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आल्याने शेतकऱ्यानी कोळसा धुळीचे प्रदुषण बंद करण्यास वारंवार संबधित अधिकाऱ्यांना तक्रार व आंदोलन केले. तरी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी वॉसरी कम्पनीला मदत करित असल्याचे दिसत आहे. आज उद्या बैठक लावुन विषय मार्गी लावु असे सातत्याने आश्वासन दिले जात होते. कोल वॉसरी च्या धुळीने त्रस्त झालेले शेतकरी व जय जवान जय किसान संघटनेने कोल वॉशरी समोर शुक्रवार (दि.२३) डिसेंबर २०२२ ला ही कोल वॉशरी बंद करण्यासाठी आंदोलन केले. तेव्हा जय जवान जय किसान संघटने चे प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण शिवराज बाबा गुजर,आणि माजी मंत्री सुनिल बाबु केदार हयानी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अशोक करे मंडळाचे सचिव प्रविण दराडे यांच्या सोबत फोन वर चर्चा करून बेकायदेशीर सुरू असलेली ही कोल वॉशरी ताबडतोब बंद करून शेतकऱ्यांना न्याय दयावा अन्यथा बेमुदत आंदोलन करू असे सांगण्यात आले. तेव्हा काही वेळ कंपनी बंद ठेऊन शनिवार (दि.२४) ला कंपनीतुन कोळस्याच्या ट्रक भरून काढु लागल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलन केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी पोलीसा व्दारे टप्या टप्याने मध्यरात्री १ वाजता आंदोलनकारी शेतकऱ्या पकडुन कन्हान पोलीस स्टेशन नेऊन शेतकऱ्याना नविन नगरपरिषदेत कोबुन ठेवले.

रविवार (दि.२५) सकाळी संतप्त सरपंचा विद्या चिखले सह चार महिला पोस्टे कन्हान ला गेले असता त्यांनाही ताब्यात घेतल्याने जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, कांग्रेस नेते चंद्रपाल चौकसे, माजी जि.प.अध्यक्ष रश्मिताई बर्वे, पारशिवनी पं.स सभापती मंगला निंबोने, प.स सदस्य निकीता भारव्दाज, रिता बर्वे, उपसभापती करूणा भोवते, नरेश बर्वे, राजेश ठाकरे, दयाराम भोयर, सिताराम भारव्दाज, देविदास जामदार, देवाजी शेळकी, बबलु बर्वे, आत्माराम उकुंडे, प्रेम रोडेकर, योगेश वाडीभस्मे, उत्तम सुळके, किशोर बेहुणे, अशोक पाटील, नरेश ढोणे, मारोती नागमोते सह बखारी, साटक, डुमरी, गोंडेगांव, जुनी कामठी, यसंबा, निलज, नांदगांव चे सरपंच सह बहु संख्येने छोटे मुले, महिला, पुरुष शेतकऱ्यांनी सकाळी पासुन पोलीस स्टेशन चा घेराव करून शेतकऱ्याना पकडुन आणुन रात्री पासुन आंतकवादया सारखे नविन नगर परिषद मध्ये कुलुप लावुन कोंबुन ठेवले का ? ते कुणाच्या तक्रारीने कुठल्या कायद्याने हे लेखी स्वरूपात देण्यात यावे. यावेळी स्थानिय जनप्रतिनिधी व राजकीय मंडळीने येऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्याने १७ तासानंतर उशीरा सायंकाळी ६ वाजता आंदोलक शेतकऱ्यांना पोलीस वाहनाने वराडा येथे नेऊन सोडण्यात आले.

रामटेक क्षेत्राचे आमदार, खासदार हयानी हजेरी लावली नाही. पोलीस प्रशानाने कम्पनीला कडक पोलीस बंदोबस्त लावुन शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यास सहकार्य करित शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन कोंबुन ठेऊन कम्पनीस चोरीने कोळसा भरून काढण्यास मदत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करित हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेतकऱ्यांचे की, उद्योगपती चे ? असा प्रश्न उपस्थितानी केला.

गुप्ता कोल वॉशरी च्या कोळसा धुळीमुळे प्रदुषित पाण्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने जिलाधिकारी डॉ. विपिन इटनकर व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यासह मागिल महिन्यात कम्पनी व शेतकऱ्यासह भेट देऊन समस्या चे निरिक्षण केले होते. प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोळ सा वॉशरी च्या अधिकाऱ्यास आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कम्पनी व्दारे दुर्लक्षित करित असल्याने शेती पिकाचे व गावकऱ्यांचे उडण्याऱ्या कोळसा धुळी अतोनात नुकसान दिवसे दिवस होतच आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य क्रॉस कंट्री स्पर्धा में जानवी को स्वर्ण पदक

Tue Dec 27 , 2022
गुवाहाटी में होनेवाली राष्ट्रीय स्पर्धा के लिए चयन नागपुर : परभणी 25 दिसंबर को हुई राज्य अजिंक्य पद क्रास कंट्री स्पर्धा 2022 में सोलह वर्ष के कम उम्र के ग्रुप में नागपुर की धाविका जानवी ज्ञानेश्वर हिरूडकर ने स्वर्ण पदक प्राप्त किया. उसके सफलता पर 8 जनवरी को आसाम राज्य के काझीरंगा में होनेवाली राष्ट्रीय स्पर्धा के लिए चयन हुआ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!