– पोलीस स्टेशन काटोलची कारवाई
काटोल :- पोलीस स्टेशन काटोल नागपुर (प्रा.) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली १) अप क्र. ११/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ भा.द.वि. २) अप क्र. १४६१/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० ३४ भादवि. ३) अप क्र. १४५७/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ भादंवि, ४) अप क्र. १३०८/२०२३ कलम ४५४,३८०, ३४ भादवि ५) अप. क्र. ०८/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ भादवि या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा कसोशीने शोध घेवुन आरोपी नामे १) राहुल रावभाजी उईके, वय १९ वर्ष रा. मरामाय नगर काटोल २) सोनु धर्मराज गुजवार, वय २५ वर्ष रा. गळपुरा काटोल, ३) हेमंत साहेबराव धुर्वे, वय २७ वर्ष रा. गळपुरा काटोल ४) संदीप उर्फ रोशन रमेश वरघट वय २८ वर्ष रा. काटोल ५) हेमंत साहेबराव धुर्वे वय २७ वर्ष रा. काटोल यांना ताब्यात घेवुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याने काटोल शहरात घरफोडीचे ०५ गुन्हे उघड करुन आरोपीतांकडून सोने, चांदीचे दागीने किंमती १,०४५२०/- रुपये नगदी १२,१५८/- रुपये व दोन मोटर सायकली किंमती ५०,०००/-रुपये असा एकुण १,६६,६७८/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात काटोल गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलेले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोदार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात बापु रोहम उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल, निशांत मेश्राम ठाणेदार काटोल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, पोलीस हवालदार कैलास उईके, पोलीस नायक भुषन मदनकर, पोलीस अंमलदार गौरव बखाल यांनी पार पाडली आहे.