पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा तपास नि:पक्षपणे करा;पोलीसांना ‘फ्री हॅण्ड’ दया, तपासात राजकीय हस्तक्षेप नको…

शशिकांत वारिशे हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधा; पत्रकारांवरचा हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला…

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक

मुंबई :- राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. वारिशे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो वापरुन रिफायनरीचे समर्थन करत होता. ही गंभीर बाब आहे. पत्रकार वारिशे यांच्या हत्येची नि:पक्षपणे चौकशी करावी, पोलीसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात यावा, तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यात पत्रकारांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असून पत्रकार वारिशे यांच्या हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

कोकणात रिफायनरी विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या गाडीला अपघात करुन त्यांना फरफटत नेले. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या हत्येतील संशयित आरोपी हा रिफायनरीचा समर्थक आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीच्या जाहिराती केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरला आहे त्यामुळे त्यांच्या संबंधित कोण आहे का? याचा तपास व्हावा माझा आरोप नाही मात्र ही बाब अत्यंत गंभीर आहे असेही अजित पवार म्हणाले.

विरोधी लिहितो म्हणून पत्रकाराची हत्या करणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना आहे. या प्रकरणाची सखोल तपासणी करुन यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अग्निशमन जवानांच्या सुरक्षिततेसाठी मनपा कटिबद्ध - प्रशासक राधाकृष्णन बी.

Tue Feb 28 , 2023
– अत्याधुनिक फायर फायटिंग सूटमुळे अग्निशमन यंत्रणेला बळकटी – आपत्कालीन परिस्थितीशी झुंज देण्यास मनपाचे अग्निशमन जवान सज्ज – अग्निशमनच्या विभागाला मिळाली १७० फायर फायटिंग सूट नागपूर :- आग लागलेल्या ठिकाणी व आणीबाणी परिस्थिती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणा-या अग्निशमन विभागातील जवानांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर महानगरपालिका कटीबद्ध आहे. मनपाद्वारे जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com