नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी परिचय कार्यक्रम नुकताच पार पडला. सेमिस्टर ३ च्या विद्यार्थ्यांकडून सेमिस्टर १ च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. टी. धुर्वे आणि डॉ. एस. सी. मसराम यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक वर्षात यशस्वी होण्याची आशा व्यक्त केली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.
यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून दिली सोबतच विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात छायाला राऊत हिला मिसेस फ्रेशर आणि रक्षित रामटेके याला मिस्टर फ्रेशर हा पुरस्कार देण्यात आला.