दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे’ नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी या विषयावरील मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार ८ व शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना स्वरूप,उद्दिष्टे, राज्यात या योजनेची करण्यात येणारी अंमलबजावणी, योजनेसाठी आलेले अर्ज, सहभागी संस्था आणि उमेदवारांनी केलेली नोंदणी, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून या योजनेसाठी करण्यात आलेली तयारी याबद्दल ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे’ नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांनी माहिती दिली आहे.

ज्येष्ट पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार 

Thu Aug 8 , 2024
– राज्यातील अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार – मार्टीसाठी ११ पदांसह ६.२५ कोटींच्या खर्चास मान्यता – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती मुंबई :- राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची (मार्टी) स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!