जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. यामध्ये ऊर्जा विभागाचे देखील सादरीकरण करण्यात आले. राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा, याविषयी ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी 10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

Mon Feb 10 , 2025
मुंबई :- महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 10, 13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे. संरक्षण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) दोन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!