‘दिलखुलास’ कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 6, शुक्रवार दि. 7, शनिवार दि.8, सोमवार दि.10 आणि मंगळवार दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत असून यामध्ये ऊर्जा विभागाचे देखील सादरीकरण करण्यात आले आहे. राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा, याविषयी ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

U.S. Consul General Mike Hankey Pays Courtesy Visit to Chief Minister Devendra Fadnavis

Wed Feb 5 , 2025
– Congratulates on Davos Investment Agreements and Industrial Opportunities Mumbai :- The United States Consul General in India, Mike Hankey, paid a courtesy visit to Chief Minister Devendra Fadnavis at Meghdoot Residence today. During the meeting, Hankey congratulated Chief Minister Fadnavis on the success of the investment agreements signed at Davos. Hankey expressed that several American companies are eager to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!