‘दिलखुलास’ कार्यक्रमात ग्रंथोत्सव या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘ग्रंथोत्सव’ या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने राज्यात ग्रंथोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे जिल्हास्तरावर कशाप्रकारे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येते. तसेच या ग्रंथोत्सवातून वाचकांना कोणकोणती ग्रंथसंपदा उपलब्ध होणार आहे याबाबतची माहिती ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमातून जाणून घेतली आहे. ही मुलाखत सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतापनगर विद्यालयात आंतरशालेय व्हाॅलीबॉल स्पर्धेचे सफल आयोजन 

Wed Nov 23 , 2022
नागपूर : प्रतापनगर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्ताने प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सोमवारी समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय आंतरशालेय व्हाॅलीबॉल स्पर्धेचे सफल आयोजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण २५ संघाने सहभाग नोंदवला. सकाळी उद्घाटनीय कार्यक्रमात समाजसेवक विनय आंबुलकर यांच्या हस्ते स्पर्धेचे रीतसर फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी छत्रपती पुरस्कार विजेते पियुष आंबुलकर, राज्य हॉलीबॉल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com