‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राज्याने नेहमीच नावीन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी एक आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशात उद्योजकांचे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना लागणारे मनुष्यबळ, रोजगार निर्मिती, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या संमेलनात महाराष्ट्राचे उभारण्यात आलेले दालन आणि उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मैत्री कक्ष होय. दावोस येथे झालेल्या परिषदेत राज्यात किती गुंतवणूक करण्यात आली आणि मैत्री कक्षाचे स्वरूप काय आहे, अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती प्रधान सचिव कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur Metro Services for India-Australia Test Match

Wed Feb 8 , 2023
Maharashtra Metro Rail Corporation Limited (Nagpur Metro Rail Project) NAGPUR: The first test match between India and Australia would be played at VCA Stadium, Jamtha from tomorrow (9th February). The match would be played from 9.30 am to 4.30 pm. Maha Metro services are available for cricket lovers from 6 am to 10 pm as usual on all the playing […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com