‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-60’ उपक्रमातील नवउद्योजकांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-60’ उपक्रमातील नवउद्योजक विकास आवटे व सायली मराठे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 4 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून याचा फायदा राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे ‘बिझनेस अॅक्सिलेटर’ स्थापन करण्यात आले आहे. भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून ‘कॉर्नेल महा-60’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील 60 निवडक तरूण उद्योजकांना याअंतर्गत वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवउद्योजकांशी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून संवाद साधला आहे. या मुलाखतीत विकास आवटे व सायली मराठे या नवउद्योजकांनी उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसेवा आयोग सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Fri Mar 3 , 2023
मुंबई :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्यासह आयोगाच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ देवानंद शिंदे, डॉ प्रताप दिघावकर, डॉ दिलीप पांढरपट्टे व डॉ अभय वाघ उपस्थित होते.   Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com