लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ विषयावर  ‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत

मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवारी ६ मे रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जम्मू आणि उधमपूर येथे राहणाऱ्या विस्थापितांसाठी  फॉर्म - एम ची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाकडून रद्द

Fri May 3 , 2024
– काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मोठा दिलासा – जिल्हा निवडणूक यंत्रणेची माहिती मुंबई उपनगर :- लोकसभा निवडणुका 2024 मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com