‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त’ उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त’ भारतीय वन सेवेतील महिला अधिकारी आणि कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत मुलाखत प्रसारित होणार आहे.

जगभरात दरवर्षी 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनानिमित्त भारतीय वन सेवेतील कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आणि वन सेवेत कांदळवन कक्षामध्ये काम करत असतांना कांदळवनांचे पर्यावरणीयदृष्ट्या महत्व तसेच कांदळवनांच्या जतन व संवर्धनासाठीचे प्रयत्न याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पाटील यांची मुलाखत शनिवार दि. 9 आणि सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 9 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

Sat Mar 9 , 2024
– 12 मार्च रोजी मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडुन पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांचे अभिनंदन मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!