एटीएमची अदला बदलीसह पळविणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

– फसवणुकीसाठी मिळविले ११७ एटीएम कार्ड

– बनवा बनवी करून एटीएममधून काढायचे रक्कम

– ७२ तासात गुन्ह्याचा छडा

नागपूर :- हात चलाखीने एटीएमची अदलाबदली करून लाखोंची रक्कम पळविणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा अंबाझरी पोलिसांनी पर्दाफाश केला. विशेश म्हणजे आरोपी एका एटीएममध्ये सावजाच्या शोधात पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. केवळ ७२ तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपींच्या ताब्यातून तब्बल ११७ एटीएम कार्डसह दोन कार, तीन मोबाईल, रोख चार हजार असा एकूण २० लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सयद खान (३४) रा. मुंबई, आलोककुमार गौतम (३२) रा. प्रतापगड आणि कलिम (२१) रा. मुंबई अशी अटकेतील सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. प्रयागराजहून अटक केल्यानंतर नागपुरात आणले. न्यायालयाने तिघांनाही २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, पोलिस उपायुक्त राहुल मदने, सपोआ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात वपोनि विनायक गोल्हे यांनी ही कारवाई  केली.

सयद खान हा मुळचा मुंबईचा रहिवासी असून इतर दोघे उत्तरप्रदेशचे आहेत. आलोक आणि कलिम हे दोघे कामाच्या शोधात मुंबईला गेले. दोघेही एकाच परिसरातील असल्याने त्यांची ओळख झाली. नंतर यांची सयद खानसोबत मैत्री झाली. तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असले तरी त्यांचा उद्देश एक होता. कमी वेळात अधिक पैसे कमविण्यासाठी शक्कल लढविली. हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करायची नंतर दुसर्‍या एटीएममध्ये जावून पीडिताच्या खात्यातील रक्कम काढून आर्थिक फसवणूक करायची. अशी त्यांची काम करण्याची पध्दत आहे.

अशी झाली घटना

भरतनगर येथील रहिवासी फिर्यादी पांडूरंग कुर्वे (७२) हे एका खाजगी कंपनीत अभियंता होते. घटनेच्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्टला सकाळी ते एसबीआय (शाखा रविनगर) येथे पैसे काढण्यासाठी गेले होते. रक्कम काढून केंद्रा बाहेर पडत असताना आरोपीपैकी एकाने त्यांना थांबविले. तुमची पावती मशिनमध्ये फसली आहे, त्यामुळे माझे पैसे निघत नाही. अशी थाप मारून त्यांना एटीएम कार्ड पुन्हा स्वॅप करण्यास सांगितले. त्याच वेळी एटीएमची अदलाबदली करून पीन कोडही मिळविला आणि लगेच काही वेळात एटीएमव्दारे ९० हजार रुपये काढले. त्यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

असा घेतला शोध

तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळाहून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक माहिती मिळविली. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर पुढील लोकेशन मिळविण्यासाठी शहर आणि महामार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांचे पथक प्रयागराजपर्यंत पोहोचले. स्थानिक पोलिसांची मदत घेतली. आरोपी पुन्हा एमटीएमध्ये शोधात असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिघांच्याही मुसक्या आवळल्या. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक मंगेश डांगे, नवनाथ ईसाये, अभय पुंडके, राजेश सोनवण, मुनिंद्र युवनाते, दिनेश जुगनाके, अमित भूरे, अंकुश घटी, प्रवीण शिंदे, उज्ज्वल पाटेकर, सतीश कारेमोरे आदींनी सहकार्य केले.

चार राज्यात घातला धुडगुस

मागील अनेक वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि हरियाना राज्यात चांगलाच धुडगुस घातला. आत्मविश्वास आणि थोडेफार तांत्रिक ज्ञानाच्या बळावर ते एटीएममधून रक्कम काढायचे. एक जन एटीएम केंद्रात तर दोघे केंद्राबाहेर पहारा देत असत. विशेषत ज्येष्ठ नागरिकांना ते लक्ष्य करायचे. रक्कम काढण्यासाठी मदत करतो किंवा तुमचे कार्ड चालत नाही, तुमच्या कार्डमुळे आमची पावती निघत नाही, असे कारण उपस्थित करून एटीएमची अदलाबदली करायचे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपाच्या राज्यातच अपराधी मोकाट म्हणून निषेध - ॲड. नंदा पराते

Fri Aug 23 , 2024
नागपूर :- नागपूर शहर (जिल्हा) महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत चार वर्षेचा दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, ही घटना अतिशय दुर्दैवी असून संताप जनक आहे. एकीकडे महायुती शासन महिलासाठी लाडकी बहीण योजना राबवतात आणि दुसरीकडे मात्र त्याच बहिणीवर, लहान मुलीवर महाराष्ट्रात दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष ॲड. नंदा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com