संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- हल्दीराम कंपनीने नुकतेच २३ ऑगस्टला सावळी येथील शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. सदर ठिकाणी जाऊन जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले व या भागातील काही शेतकऱ्यांनी हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की आपण बांधकामा अगोदर सदर जागेचे सिमांकन करून मोजणी करावी व त्यानंतरच बांधकाम करावे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कसलेही म्हणणे ऐकून न घेता त्यावेळेस धक्काबुक्की करून जि.प सदस्य दिनेश ढोले व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली तसेच दिनेश ढोले यांच्यावर 5 लक्ष रु. खंडणी मागितली असा खोटा आरोप कंपनीच्या अधिकाऱ्यानी लावला.
या सर्व गोष्टीचा जाहीर निषेध म्हणून आज हल्दीराम कंपनी समोर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात तीव्र जनआंदोलन करून बेजबाबदार व बेईमान हल्दीराम कंपनीच्या प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध करण्यात आला.कंपनीच्या मालकांनी सुशील अग्रवाल यांनी स्वतः तिथे येऊन दिलगिरी व्यक्त केली व जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले व सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली व पांदण रस्त्यावरचे जे बांधकाम सुरू आहे ते तात्काळ थांबवले,
यावेळेस प्रामुख्याने योगेश देशमुख ( जि. प. सदस्य नागपूर ), अनुराग भोयर ( महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ), विष्णूजी कोकाडे, दिशा चणकापूरे ( सभापती पं. स. कामठी, दिलीप वंजारी उपसभापती, सोनू कुथे सदस्य पं स, सलामत अली( अध्यक्ष कामठी- मौदा विधानसभा युवक काँग्रेस ), निखिल फलके ( अध्यक्ष युवक काँग्रेस) ,अनिकेत शहाणे, कुणाल इटकेल्वार, ज्ञानेश्वर वानखेडे , किशोर धांडे,स्वप्निल श्रावणकर,( सभापती मौदा ) संकेत झाडे, संकेत बावणकुळे, प्रकाश गजभिये, तुळसा शेंदरे, आरती शहाणे, विजय खोडके, अर्जुन राऊत ,प्रभाकर हूड ,अशोक घुले, अनंता वाघ, कृष्णाजी करडभाजणे, देवेंद्र येंडे ,रुपेश शेंद्रे ,डुमदेव नाटकर, पांडुरंग भगत, चंदू हेवट, नीलकंठ भगत , छोटू लीलारे , गणपत वानखेडे, बाबाराव चौधरी ,चंद्रभान इंगोले,कोमल तट्टे, प्रवीण निंबुळकर,मनोज कुथे, विनोद शहाणे,जगदीश पौनीकर ,सुरेश डोंगरे, विजय खोडके ,रमेश काळे, अमृत पांडे, राजू चंडी मेश्राम ,राजेंद्र चारडे, शंकर रोटे, चंद्रकांत धुले, ज्ञानेश्वर इंगोले ,ललित वैरागडे ,मंगेश गेजोडे, मंगेश जगताप ,राकेश आखरे , रवी लांडे , नानाभाऊ वाघ आकाश बाराहाते ,राजू हटवार ,खुशाल डाफ, अमोल निधान, अतुल ठाकरे ,रुपेश हीवसे ,नंदू मोहोळ , प्रशांत सांबारे , नानाभाऊ आगलावे ,महेश कृपाले, शेखर शहाणे, रवी रंगारी, हमराज गोरले, मोती इंगोले ,मधुकर ठाकरे, अतुल चौधरी ,प्रमोद तट्टे ,सतीश खेळकर, विनोद शहाणे, मनोज ढोबळे, सोनुताई काळे ,सुरेश घोडमारे, चिंतामणी इंगळे, निखिल गेडेकर ,अश्विन मासुरकर , रमेश भोयर ,अतुल गजभिये ,रुपेश हिवसे , हरीश कातोरे, मनोज मेश्राम ,मुरलीधर जोड ,दुर्योधन वंजारी, योगेश झोड, पवन सहारे, सोपान गावंडे ,अरुण बारई ,गणेश गावंडे ,विनोद गावंडे, संजय ठाकरे, पंकज कुत्तथे व परिसरातील सर्व शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.