रस्ते अपघातांवर नियंत्रणाकरीता एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली – मंत्री दादाजी भुसे

मुंबई :- राज्यात रस्ता अपघातांची संख्या कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून कृती आराखडा तयार करून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. अशी माहिती, मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

सदस्य भीमराव तापकीर यांनी ‘राज्यात होत असलेले वाहन अपघात’ विषयावर अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.

मंत्री भुसे म्हणाले की, पुणे शहरात लोकसंख्या वाढत असून वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. पुणे शहरातील अपघात कमी करण्यासाठी महानगरपालिका, परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन एक महिन्याच्या आत पुण्यात करण्यात येईल. पुणे शहरात प्राणांतिक अपघातामधील घटना 2022 मध्ये 696, तर 2023 मध्ये 596 घडल्या. यामध्ये 14.40 टक्क्यांची घट झाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील अपघातातील अशा घटनांमध्ये 1.4 टक्क्याने कमी झाल्या आहे. पुणे परिवहन कार्यालयामार्फत शहरातील वाहतूक नियम मोडणाऱ्या 1943 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 13.16 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी ते मे 2024 दरम्यान विविध गुन्ह्यापोटी 49 हजार 447 वाहने दोषी आढळून आली आहेत. या वाहनधारकांकडून 798.77 लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन चालक चाचणी, अपघातांची ऑनलाईन नोंदणी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येत आहे. चालकांसाठी नेत्र, आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील अपघातांची प्रमाण कमी होत असल्याची नोंद आहे, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रलंबित जलसंधारण योजनांचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा - मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Sat Jul 6 , 2024
मुंबई :- मृद व जलसंधारण विभाग व जलसंधारण महामंडळाने कार्यारंभ आदेश दिलेल्या आणि दोन वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या जलसंधारणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. या संदर्भात आढावा बैठक मंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी मंत्री राठोड बोलत होते. यावेळी बैठकीस व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशीरे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com