सावनेर :-पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत मौजा धापेवाडा बुजुर्ग येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिनांक ०३/०७/२०२४ रोजी १७.४५ वा. ते १८.४० वाजता पर्यंत आषाढी एकादशी निमीत्ताने मोठया प्रमाणात यात्रा भरणार असल्याने तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार असल्याने यात्रा स्थळाची पाहणी अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांनी रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर,योगेश कामाले पोलीस निरीक्षक कळमेश्वर यांचे सह पाहणी केली, सदर ठिकाणी यात्रे संबंधित उपाययोजना करणे सुरू असल्याचे दिसून आले. योग्य नियोजन करण्याबाबत आयोजकांना मार्गदर्शन करण्यात आले.