गडचिरोली :- सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ क्षेत्रात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज भेट देवुन निवडणुक बाबतच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी, यांनी आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट दिली. तसेच, देसाईगंज येथील स्ट्रांग रूमची तपासणी करून आवश्यक सुचना दिल्या. देसाईगंज तहसिल कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे निवडणुक कामाकरीता नियुक्त केलेल्या विविध विभागांना भेट दिली आणि निवडणुक कर्तव्य व जबाबदारी चोख पणे पार पाडण्याचे सुचना अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
यावेळी 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्राच्या निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी तसेच, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.