– पहिल्या दिवशी ४२ मैदानांची सफाई : १६ नोव्हेंबरपर्यंत अभियान
नागपूर :- ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दहाही झोनमधील सर्व मैदानांची सखोल स्वच्छता करण्यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी मैदानांच्या सखोल स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान नागपूर शहरातील सर्व मैदानांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे.
अभियानाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता.११) दहाही झोनमधील ४२ मैदानांची सखोल स्वच्छता करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये मैदानांच्या स्वच्छतेसाठी झोनल अधिकारी व त्यांच्या नेतृत्वामध्ये स्वास्थ निरीक्षकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी (ता.११) सकाळी ६ वाजतापासून ४२ मैदानांमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
लक्ष्मीनगर झोनमधील पश्चिम समर्थ नगर, हनुमान मंदिर मैदान उज्ज्वल नगर, इंडियन जिमखाना धंतोली, बास्केटबॉल मैदान बजाजनगर, सीतानगर धवड महाविद्यालय, हनुमान मंदिर पांडे लेआउट, धरमपेठ झोनमधील फुटाळा तलाव मैदान, प्रियदर्शनी कॉलनी सिव्हिल लाईन्स, सदर गांधी चौक तुटाबगीचा, सुळे हायस्कूल मागील मैदान धंतोली, शामला शक्ती पायदानवाला टेकडी रोड, त्रिकोणी पार्क, रामदासपेठ लेंड्रा पार्क, हनुमान नगर झोनमधील योगा भवन महालक्ष्मीनगर, चौकोणी मैदान हनुमान नगर, चक्रधर नगर मैदान, कलोडे महाविद्यालय नासुप्र मैदान, शताब्दी लंगर नासुप्र मैदान, धंतोली झोनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कुकडे लेआउट, त्रिकोणी मैदान मानवता शाळेजवळ, लक्षवेध मैदान अरविंद सोसायटी नरेंद्रनगर, राजाबाक्षा मैदान मेडिकल चौक, नेहरूनगर झोनमधील स्वराज विहार मैदान, आयुर्वेदिक लेआउट मैदान, सद्भावना नगर मैदान शितला माता मंदिर जवळ, नासुप्र मैदान कामगार नगर, वैभव नगर मैदान दिघोरी, सोनझरी नगर मैदान, न्यू सुभेदार लेआउट मैदान, गांधीबाग झोनमधील नुराण मैदान अंसार नगर, गाडीखाना मैदान, चिटणीस पार्क मैदान, दिघोरीकर मैदान धावडे मोहल्ला बगडगंज, सतरंजीपुरा झोनमधील आदिवासी कॉलनी मैदान, पंचवटी मैदान, लकडगंज झोनमधील नेताजी नगर, कच्छी विसा मैदान, शास्त्री नगर नासुप्र मैदान, भास्कर व्यास योगा मैदान वर्धमान नगर, आरटीओ मैदान डिप्टी सिग्नल, आशीनगर झोनमधील सहयोग नगर फुटबॉल मैदान, मंगळवारी झोनमधील सिंधू बालोद्यान जरीपटका, बेझनबाग मैदान या सर्व ४२ मैदानांमध्ये मनपाच्या सफाई कर्मचा-यांद्वारे सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय देशमुख व संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी या अभियानामध्ये सहभागी होउन वेगवेगळ्या मैदानांमध्ये भेट देउन सखोल स्वच्छता अभियानाची पाहणी केली. मैदानांची सखोल स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवारी (ता.१२) इतर ४० मैदानांची स्वच्छता करण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व सहा. आयुक्त, झोनल स्वच्छता अधिकारी यांनी या अभियानात सहभाग घेतला.