“अटल भूजल योजनेतंर्गत केलेल्या अभ्यास दौऱ्यातून जलव्यवस्थापनाची माहिती”

नागपूर :- अटल भूजल योजनेंतर्गत जिल्हयातील काटोल व नरखेड तालुक्यातील योजनेमध्ये समाविष्ठ गावातील सरपंच ,ग्रामसेवक, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी यांना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा पि. माने यांच्या मार्गदर्शनाखाली नरखेड तालुक्यातील मौजा चोरखैरी अनंत धवड यांचे शेतावर जिल्हास्तरीय एकदिवशीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नरखेड तालुक्यातील सिंदीच्या (उमरी) सरपंच प्रगती सावध यांनी त्यांच्या गावामध्ये गाव शिवारातील माथा ते पायथा जलसंधारणाची कामे कशा पद्धतीने करण्यात आली व शेतक-यांनी लोकसहभागातून पिकपध्दती व पिक नियोजन व सुक्ष्मसिंचनावर शेती, संत्राच्या बागा करण्यास सुरुवात केली याबाबत माहिती दिली. अनंत धवड यांची शेत जमीन ही मध्यम स्वरुपाची असल्यामूळे या जमीनीत पाणी टिकून राहत नाही, त्यामुळे त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानूसार शेत जमीन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कशी विकसित केली याबाबत कोंढाळीचे कृषी पर्यवेक्षक सावध, यांनी मार्गदर्शन केले. तसेच इंडो इजराइल पद्धतीने संत्रा लागवड, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, शेततळे, बांध बंदिस्त, मल्चिंग, सेंद्रिय पद्धतीचा वापर, आदी कामांना प्रत्यक्ष भेट देण्यात येऊन सुक्ष्म सिंचनाचा वापर कशा पध्दतीने केलेला आहे, याबाबत सदर अभ्यास दौऱ्यात उपस्थित असलेल्या सरपंच, ग्रामसेवक व शेतकरी यांना पाणी बचतीचे महत्व सांगून कमी पाण्यावर जास्त नफा देणारी पिके घेण्याविषयी सांगीतले. जास्तीत जास्त पाण्याची बचत केली पाहीजे त्याच बरोबर गावातील पाण्याचे नियोजन केल्यास त्या पाण्याचा वापर वर्षभर करता येऊ शकतो, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या अभ्यास दौऱ्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सहायक भूवैज्ञानिक डॉ. रेखा बोधनकर, मृणाल पेटकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक शिल्पा जनक, नंदकिशोर बोरकर, जलसंवर्धन तज्ञ दर्शन दुरबुळे, कृषी तज्ञ प्रतीक हेडाऊ, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, तथा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच जिल्हा अमलबजावणी भागीदार संस्थेचे सहाय्यक कृषी तज्ञ विवेक मुंदाफळे, समूह संघटक ,योजनेमध्ये समाविष्ट गावाचे कृषी सहाय्यक यांनी सहकार्य केले. अभ्यास दौरा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद तज्ञ सतीश हेलोंडे यांनी केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार - मंत्री संजय बनसोडे

Sat Dec 16 , 2023
नागपूर :- राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावण्यासाठी योजनाबद्ध कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्रबिंदु मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत “मिशन लक्ष्यवेध” आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रीमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून मिशन लक्ष्यवेध ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com