उद्योग विभागाचा रिन्यु पॉवर सोबत सामंजस्य करार, राज्याचे सर्वोतोपरी सहकार्य मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्यावतीने डॉ.अमित पैठणकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. त्याचप्रमाणे इथे आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. कारण उद्योग वाढीसाठी लागणारे पूरक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. आर्थिक परिस्थिती कोविड काळातही स्थिर होती. रिन्यु पॉवर या कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प हा नागपूरात येत असल्याने विशेष सहकार्य करण्यात येईल असेही  फडणवीस म्हणाले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या प्रयत्नाने होत असलेल्या या सामंजस्य कराराचे विशेष स्वागत केले. या सामजंस्य कराराच्या माध्यमातून नविनीकरणीय उर्जा क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

या कराराच्या माध्यमातून राज्यात होत असलेली गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासंदर्भात प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी माहिती दिली. तर एम आय डी सी चे मुख्यकार्यकारी अधिकारी शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित

सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती

मे. रिन्यू पॉवर लि., दिल्ली या घटकामार्फत १० गिगावॅट मेटाल्युर्जिकल ग्रेड सिलिका, १० गिगावॅट पॉलिसिलीकॉन, ६ गिगावॅट इनगॉट/वेफर निर्मिती सुविधा आणि १ गिगावॅट मॉड्युल निर्मितीची सुविधा नवीकरणीय ऊर्जा ब्लॉकसह एकात्मिक प्रकल्प स्थापित करणार आहे.

हा प्रकल्प नागपूर येथे स्थापित होणे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प सुमारे ५०० एकर जागेवर स्थापित होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८,००० ते १०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित असलेल्या उद्योगांच्या (Ancillary Unit) माध्यमातून रु. २००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक होणार आहे.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest- EoI) करण्यात आला आहे.

मे. रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्या वतीने समुह अध्यक्ष डॉ. अमित पैठणकर व राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव उद्योग डॉ.हर्षदीप कांबळे यांनी स्वारस्य अभिव्यक्ती Expression of Interest (EoI) वर स्वाक्षरी केली.

यावेळी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर, मे. रिन्यू पॉवर प्रा. लि.चे प्रमुख तांत्रिक अधिकारी सर्वनंट सेण्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी मार्कम सिकमोक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जय महाराष्ट्र कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रा. डॉ. हर्षद भोसले यांचे व्याख्यान

Fri Jun 23 , 2023
मुंबई :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी 26 जून रोजी साजरी करण्यात येते. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून ही साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई येथील कीर्ती महाविद्यालयातील प्रा. डॉ. हर्षद भोसले यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com