संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहराची स्थापना ही इंग्रज राजवटीत झाली असून तालुकादर्जाप्राप्त कामठी शहर हे नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाते.स्वातंत्र्य नंतर या शहरातील नागरीकानी आपला परंपरागत बिडी आणि विणकाम सुरू ठेवून त्यावर उदरनिर्वाह सुरू ठेवला.कालांतराने हे दोन्ही व्यवसाय आता काळाआड झाले आहेत तसेच या शहरातील मिनी एमआयडीसी असलेल्या रामगढ जवळील औद्योगिक क्षेत्रातील जुने व्यवसाय हे मोडकळीस आले असून या व्यवसायिक इमारती जीर्ण झाले आहेत तसेच या कंपन्यांच्या जुन्या विस्तारित पडक्या जागेवर शहरातील धनदांडग्यांची नजर असून हे धनदांडगे कसेबसे ही जागा ताब्यात घेऊन या शहरातील श्रीमंत अजून श्रीमंत होईल मात्र येथील विस्कटलेली औद्योगिक व्यवस्था, येथील बेरोजगारी लक्षात घेत स्थानिक शासन प्रशासनाने पुढाकार घेतल्यास या मोडक्या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल मात्र याकडे कुणीही पुढाकार घेत नसल्याने या कामठी शहरातील औद्योगिक विकास अजूनही शून्य आहे.
पूर्वीच्या काळी कामठी शहरातील नवीन कामठी असलेल्या रामगढ , आनंद नगर ,अनाज गोदाम जवळील भागात सर्वच उद्योग सुरू असल्याने या परिसराला औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख होती.या परिसरात गोंडवाना पेंट, डिस्टमपर, बाबा रोलिंगस मिल, दाल मिल, टाईल्स कंपनी ,संजीव बिडी उद्योग,गोल्डन बिडी ऊद्योग, रॉकेट बिडी उद्योग,यांसारखे उद्योग होते .कालांतराने सारे उद्योग एकापाठोपाठ बंद गेले. मात्र आजही या बंद उद्योगाचे अवशेष आजही येथे बघावयास मिळतात.या शहरातील कित्येकच लोकप्रतिनिधीं नी शहरातील गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकीय सत्तेचा उपभोग घेतला मात्र या बंद पडलेले उद्योग व शहरातील वाढती बेरोजगारांची फौज याकडे कुणाचेही लक्ष वेधले नाही.कामठी शहराला अनेक लोकप्रतिनिधी मिळाले त्यातले अनेक केंद्रात व राज्यात मंत्री सुदधा झाले परंतु या शहराचे दुर्भाग्य असे की या शहराचा औद्योगिक दृष्ट्या अपेक्षित विकास झाला नाही.येथील नागरिक दशकाहून अनेक दशके बिडी आणि कापड उद्योगाशी जुळलेले होते मात्र आता दोन्ही उद्योग या शहरातून हद्दपार झाले आहेत.मात्र या शहरात औद्योगिक क्रांती व्हावी असा प्रयत्न कोणत्याही लोकप्रतिनिधीने केलेला नाही.
एक काळ असा होता की येथे हातमागावर विणलेले कपडे विदेशात जात असे मात्र आता या उद्योगांना पुनररुज्जीवित करण्याची गरज आहे.कामठी तालुक्यात अशा बहुतेक जागा लिज संपलेल्या आहेत .त्या मोकळ्या जागेवर येथील धनदंडग्याचा ताब्यात जाण्यापेक्षा ही जागा शासनाने ताब्यात घेत तेथे टेक्स्टाईलस झोन बनवावे, ज्यात कापड निर्माण, प्रोसेसिंग सोबतच आंतररराष्ट्रीय स्वरूपाची कापडाची बाजारपेठ येथे निर्माण केली जाऊ शकते यामुळे व्यापार व्यवसाय वाढून बेरोजगारांची समस्या नष्ट होऊ शकते तसेच शिल्लक काही जमिनीवर इतर उद्योगही उभारले जाऊ शकतात .या शहरात स्थानिक लोकप्रतिनिधो व शासन प्रशासनाचे कुठलेही नियोजन नसून अक्षम्य दुर्लक्ष असल्याने कामठी शहरात बिनधास्त पणे अतिक्रमण वाढत आहे त्याचबरोबर शहरातील बेरोजगाराची फौज सुद्धा हनुमानाच्या शेपटी प्रमाणे वाढत आहे.