घरातील बीम कोसडून एका विवाहित  तरुणाचा  मृत्यू;शीतलवाडी येथील घटना

रामटेक :-घरातील काही काम रिपेअर करताना घरातील बीम कोसडून डोक्याला लागल्याने  एका विवाहित तरुणाचा मृत्यू   आज दि २४ नोव्हे ला सकाळी दरम्यान शीतलवाडी परिसरात  घडली.सविस्तर माहिती अशी की मृतक प्रजवलीत प्रवीण अंधारमुले वय ४१ वर्ष रा शास्त्री वॉर्ड ,रामटेक येथील रहिवासी असून त्याने शीतलवाडी येथे एक घर विकत घेतले होते.त्या घराच काही काम रिपेअर कराचं म्हणून त्या  ठिकाणी  आज सकाळी तो गेला होता.तिथे मजूर पण उपस्थित होते.लगेचच त्या घरातील एक बीम खाली कोसडला व मृतक तिथेच उभा  असल्याने त्याचा डोक्यावरच भीम  पडल्याने त्याला जोरदार मार लागला .तेथील लोकांनी त्याला नजिकच असलेल्या रुग्णाल्यात नेले असता त्याला सरकारी रुग्णाल्यात न्या म्हणून तेथील डॉ. नी  म्हटले असता  लगेचच सरकारी रुग्णाल्यालयात आणले तेथील डॉ . ने त्याला मृत घोषित केले.मृतक च्या मागे पत्नी ,आई वडील, एक मुलगा व एक मुलगी असून तो एक व्यसायिक होता. मृतक चा शेवविचेदन करण्यात आले असून  आज त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला. त्याचा अश्या अपघाती मृत्युने घरातील लोक  व परिसरातील   नागरिक   हळहळ व्यक्त करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांची घणाघाती टीका

Thu Nov 25 , 2021
बीड- साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या  घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश  सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी  स्वत:च कायदा हाती घ्यायचा  की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे ? असा संतप्त सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांनी बुधवारी  पत्रकार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com