– बेस्टेको सोल्युशन्स अँड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे द्वारा आयोजित
नागपूर :- शिवाजीनगर येथील सेंट्युरियन हॉटेलमध्ये बेस्टेको सोल्युशन्स अँड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे दोन दिवसीय अल्टिमेट बायोगॅस मास्टरी प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. बायोगॅस क्षेत्रावर आधारित हा जगातील पहिलाच अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम ठरला. संशोधन संस्थांपासून ते उद्योग आणि गुंतवणूकदारांपर्यंत विविध क्षेत्रातील सहभागाची नोंद झाली.
या कार्यक्रमाचा उद्देश नूतनीकरणीय व शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील बायोगॅस आणि बायोएनर्जीला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी उपक्रमांना साथ देणे हा होता. हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून बायोएनर्जीच्या क्षेत्रातील एक सखोल अनुभवात्मक प्रवास होता. सहभागींच्या व्यावहारिक कौशल्यात भर घालणाऱ्या ह्या कार्यक्रमामध्ये बायोगॅस प्रणाली, डायजेस्टर्स, सब्स्ट्रेट्स आणि प्रकल्प व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. अशिष पोलकडे, ज्यांना बायोगॅस प्रणाली व कचरा व्यवस्थापनाच्या जैविक प्रक्रियांमध्ये २४ वर्षांचा अनुभव आहे, यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. त्यांच्या सखोल ज्ञानाने सहभागींचे मार्गदर्शन केले. तसेच, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ सूरज भगत यांनी कार्यक्रमात सहभागींना प्रोत्साहन देणाऱ्या सत्रांचे आयोजन केले.
बायोगॅस आणि बायोएनर्जी उपक्रमांमध्ये सरकारी सहभाग वाढवण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे. ऊर्जा स्वावलंबी भारत घडविण्याच्या दृष्टिकोनातून, अल्टिमेट बायोगॅस मास्टरी प्रोग्राम नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण शिक्षणाचा एक दीपस्तंभ ठरत आहे. असे कार्यक्रमाचे विशेष अतिथी समाजसेवक डॉ. निखिल भुते यांनी सांगितले व संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहून त्याच्या प्रभावाने प्रभावित होऊन पुढील कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली.
डॉ. तुषार लोडा (पुणे), डॉ. निखिल भुते (नागपूर), संयोगिता बेरडे(पुणे), परामजित सरोज (लखनऊ), निमिशा फरन्यानडीस (गोवा), दुवा गोखले(पुणे), प्रियदर्शनी सहस्त्रबुद्धे(पुणे), श्रीपाल कोठारी(यवतमाळ), पृथ्वीराज रायगुडे(पुणे), सहभागींनी या कार्यक्रमाचा उत्साहाने गौरव केला. अनेकांनी हा कार्यक्रम परिवर्तनात्मक असल्याचे म्हटले. “या कार्यक्रमाने व्यावसायिक कौशल्यांना चालना देणारे व्यावहारिक दृष्टिकोन दिले,” असे एका सहभागीने सांगितले. कार्यक्रमातील सहभागींना सन्मानपत्र व संपूर्ण कार्यक्रमाची किट आणि एन्व्हायरमेंट लीडर्स क्लब चे विनामूल्य सदस्य पत्र कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अश्विन हरिभक्त, साक्षी कोटकर, सुहाग रेनारे यांनी परिश्रम घेतले.