नागपूर :- नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन ब्युरो ऑफ माईन्स – आयबीएम मुख्यालयातून आज अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागपूरच्या झिरो माईल पर्यंत ‘स्वच्छता ही सेवा ‘ या उपक्रमांतर्गत सायकल रॅली आयोजित केली.
या सायकल रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व सायकलींगचा स्वास्थ जीवनशैलीत समावेश त्याचप्रमाणे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी संदेश देण्यात आला.
याप्रसंगी अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतः सायकलिंग करून स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण यांचे संदेश देणाऱ्या बॅनरच्या सहाय्याने जनजागृती केली.
याप्रसंगी भारतीय खान ब्युरोचे, नागपूरचे मुख्य खनन भूवैज्ञानिक संतोष कुमार अधिकारी तसेच आयबीएमचे इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.