रामटेक :- स्थानिक तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांनी ध्वजारोहण केले. यावेळी प्रामुख्याने आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, तहसीलदार हंसा मोहने, उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे, पोलीस निरिक्षक हृदयनारायण यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के यांनी आपल्या ताफ्यासह सलामी दिली. यानंतर उपस्थित आणि एकमेकांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर तहसील कार्यालयातील भवनामध्ये सत्कार सोहळा पार पडला यामध्ये स्वतंत्रता संग्राम सेनानी यांच्या वारसांचा सत्कार तथा नवनियुक्त पोलीस पाटलांना नियुक्तीपत्र देण्यात आले. स्वतंत्रता संग्राम सेनानी यांच्या वारसांमध्ये गुलाबचंद हटवार, केशवराव भुजाडे, पुंजाराम रामजी राऊत, राजाराम शेजाराम लोधी, काशिनाथ बडवाईक, विठ्ठलराव अडकु हटवार, मोतीराम महाजन, सिताराम बाळाजी हेडाऊ, विठ्ठलराव ठोंबरे, पुना रामजी धनगाव, महादेवराव वाडकर, पद्माकर मेहता, झिंगर सोनबाजी पद्धती यांच्या वारसांचा शाल आदी. देवुन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नवनियुक्त पोलीस पाटलांना नियुक्तीपत्र देण्यात आले. संचालन तथा आभार नायब तहसिलदार कुलदीवार यांनी केले. यावेळी उपस्थीतांमध्ये आमदार आशिष जयस्वाल, एस.डी.ओ. वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने , माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत, माजी आमदार आनंदराव देशमुख, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, गजेंद्र चौकसे, न.प. प्रशाषकिय अधिकारी सव्वालाखे आदींसह अधिकारी – कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
अनेक लोकं अंत्योदय योजनेपासुन वंचीत – आमदार आशिष जयस्वाल
कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल यांनी उपस्थितांना ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तथा अनेक लोकं अंत्योदय योजनेपासुन अजुनही वंचीत असल्याचा खेद व्यक्त करीत ज्या नागरीकांचा अद्यापही विकास झाला नाही त्यांच्या विकासाची जबाबदारी प्रशासकिय यंत्रणा व राजकिय पदाधिकाऱ्यांनी घ्यावी असे सांगीतले. आपल्या प्राचीन ऐतीह्यासीक नगरीत खुप काही विकासात्मक करायचे असल्याचेही त्यांनी सांगीतले.