ॲल्युमिनीअम चोरी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

मौदा :-पोलीस स्टेशन मौदा अप. क्र. १२२७/२३ कलम ३७९ भा.दं.वि. चे गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत असता गुप्त माहितगाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, कळमना येथे राहणारा नितीश प्रजापती हा मागील काही महिन्यापासुन कळमना वस्तीत राहून आपले साथीदारांसह मिळून तार चोरीचे गुन्हे करीत आहे. अशा खबरेवरून दि. ०५/०१/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी शिवशक्ती बारचे मागे असलेल्या एका झोपडीत सापळा रचुन तेथे तिन इसम १) नितीश जुगराज कुमार (प्रजापती) वय २० वर्ष रा. परवेजपुर, पोस्ट अडया थाना खकरेडू जि. फतेहपुर (यु.पी.) २) राधेशाम श्रीराममनोहर निसार वय १९ वर्ष रा. परवेजपुर, पोस्ट अडया थाना खकरेडू जि. फतेहपुर (यु.पी.) ३) ज्ञानेंद्रकुमार कल्लु निसार वय २० वर्ष रा. परवेजपुर, पोस्ट अडया थाना खकरेडू जि. फतेहपुर (यु.पी.) तिन्ही ह. मु. शिवशक्ती बारचे मागे कळमना नागपूर यांना ताब्यात घेवुन त्यांना इलेक्ट्रीक पोल वरील तार चोरी बाबत सखोल विचारपुस केली असता अगोदर त्यांनी उडवाउडविचे उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगीतले की त्यांचा मुख्य साथीदार फरार नामे -निरजकुमार प्रजापती रा. पहाडपुर थाना किसनपुर जि. फतेहपुर (यु.पी.) याचे सोबत मिळून इंद्रेश छेदीलाल शाहू, वय २५ वर्ष, रा. पुराना कामठी रोड, शनी मंदीर जवळ कळमना, नागपूर याचे बोलेरो पिकअपचे मदतीने महालगाव, भुगाव, परसाड, गुमथळा तसेच कन्हान परिसरातील बंद असलेल्या इलेक्ट्रीक लाईन वरील अॅल्युमिनीयम तार कापून एकूण ०६ वेळा वेगवेगळ्या ठिकाणाहून अॅल्युमिनीयम तार कापून चोरी केल्याची कबुली दिली. व सदर चोरी केलेला अॅल्युमिनीयम तार हा कळमना येथील इंद्रेश शाहू याला विकल्याचे सांगीतले. तिन्ही इसमांना ताब्यात घेवुन सोबत तिन्ही इसमांना त्याचेकडे विकलेल्या अॅल्युमिनीयम इलेक्ट्रीक ताराबाबत विचारणा केली असता सदर तार ०६ वेळा त्याचे कडे असलेल्या महिन्द्रा बोलेरो पिकअप मालवाहू के. एम. एच-४९/डी-२८५९ ने आणल्याने सदर तार त्यांचे कडून घेतल्याची कबुली दिली व सदर तार हा त्याने आपले गोडावुन मध्ये विक्री करण्याचे उद्देशाने राखुन ठेवलेला असल्याचे सांगीतले.

आरोपीतांच्या ताब्यातून मौजा महालगाव, झरप, चिखली, सिवनी, चिखली, परसाड, उमरी, परसाड शिवार तसेच कन्हान टोल नाक्याच्या मागे नविन गोंडेगाव शिवार असे एकुण ०६ ठिकाणाहुन चोरी केलेल्या अॅल्युमिनीअम तार पैकी एकुण ३५५ किलो अॅल्युमिनीअम तार किंमती २,१३,०००/- रू. गुन्हयात वापरलेली महिन्द्रा बोलेरो पिकअप मालवाहू के. एम. एच-४९/डी-२८५९ किमती ३,५०,०००/-रू, असा एकुण ५,६३,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे  पोलीस अधीक्षक हर्ष पोहार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बद्दलाल पांडे, सहायक फौजदार ज्ञानेश्वर राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, ईकबाल शेख, पोलीस नायक विरेंद्र नरड, संजय बरोदीया, चालक पोलीस हवालदार मुकेश शुक्ला, विपीन गायधने, सायबर सेलचे सतिश राठोड यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उत्तर प्रदेश येथील घर सोडून निघालेल्या मतिमंद मुलाला जलालखेडा पोलिसांनी केले त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात

Mon Jan 8 , 2024
जलालखेडा :-दिनांक ०३/०१/२०२४ रोजी ग्राम परसोडी (दीक्षित) येथे गावामध्ये अनोळखी मतिमंद मुलगा फिरताना आढळून आल्याने ग्राम परसोडी (दीक्षित) येथील पोलीस पाटील टेकाडे यांनी त्याला विचारपूस केली असता तो कोणताही पत्ता व काही माहिती सांगत नसल्याने पोलीस पाटील व गावातील काही इसम यांनी त्यास पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आणून हजर केले. सदर अनोळखी मतिमंद मुलगा याला पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सी. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!