नागपूर :- पूर्व नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्य त्यांनी कोणतेही बुके व गिफ्ट न आणता सेवा सप्ताह आयोजित करण्याचे आव्हान केले. त्या अनुषंगाने आमदार कृष्णा खोपडे यांचे नेतृत्वात पूर्व नागपुरात “शासन आपल्या दारी” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 जुलै 2023 पासून सुरुवात झालेली असून पहिला टप्पा शांतीनगर व दुसरा टप्पा सूर्यनगर, कळमना रोड येथे संपन्न झाला. तसेच 25 जुलै पासून संत गोराकुंभार चौक ग्राउंड, के.डी.के.कॉलेज रोड, नंदनवन येथे शिबीर सुरु असून दोन दिवसात तब्बल दोन हजार पाचशे नागरिकांनी लाभ घेतला. गुरुवारी पावसामुळे शिबीर बंद ठेवण्यात आले असून वाढता प्रतिसाद लक्षात घेता पुन्हा एक दिवस वाढवून आता सदर शिबीर 29 जुलै पर्यंत असणार आहे. त्यानंतर दि. 08 ते 11 ऑगष्ट रोजी भवानी मंदिर प्रांगण, पुनापूर, पारडी, नागपूर येथे शेवटचे शिबीर असणार आहे.
सदर शिबिरात नवीन आधार कार्ड/दुरुस्ती, शिधापत्रिका (नवीन व बदल), बांधकाम कामगार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, एस.टी.पास (जेष्ठ नागरिक/दिव्यांग), नवीन वीज कनेक्शन, नवीन मतदार नोंदणी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत), दिव्यांग प्रमाणपत्र व कार्ड नोंदणी, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, स्वनिधी योजना (पथविक्रेतेसाठी), जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ना.सु.प्र. संबंधित सर्व बांधकामे आदी योजनांचा समावेश आहे.
प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी सदर शिबिराला भेट दिली असून त्यांचे हस्ते अनेक लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सिटी सर्वे आखीव पत्रिका वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माध्यमातून नेत्र व कर्ण तपासणी या शिबिरात करण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. विविध योजनांचा लाभ एका छताखाली जलद गतीने मिळावा, याकरिता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करिता जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.
या शिबिरात शहर अध्यक्ष बंटी कुकडे, संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, महामंत्री सेतराम सेलोकर, राजू गोतमारे, जे.पी.शर्मा, संपर्क प्रमुख सुनिल सूर्यवंशी, माजी नगरसेवक धर्मपाल मेश्राम, मनिषा कोठे, समिता चकोले, हरीश दिकोंडवार, वंदना भुरे, मनिषा धावडे, कांता रारोकर, सन्नी राऊत, बालू रारोकर, निशा भोयर, सीमा ढोमणे, अशोक देशमुख, प्रवीण बोबडे, प्रशांत मानापुरे, राजेश संगेवार, सुरेश बारई, विजय ढोले, पिंटू गिऱ्हे, आशिष कनोजे, आशिष मर्जीवे, हितेश जोशी, नाना पडोळे, सुधीर दुबे, नरेंद्र लांजेवार, इंद्रजीत वासनिक, पिंटू पटेल, सुनिल आग्रे, रुपेश मेश्राम, सुनिल मानापुरे, निरंजन दहीवले, कल्पना सारवे, गायत्री उचितकर, मदनकर, नंदा येवले, नंदा भोयर, वैशाली पिसे, संगीता आदमने, मीनल चरपे, सारिका ताटे, आदिती लांजेवार, शीला वासमवार, मोनाली काथवटे यांनी विशेष सहयोग दिला.