महावितरणच्या रूफ टॉप सोलरला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

नागपूर :- घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या ‘रूफ टॉप सोलर’, योजनेला महावितरणच्या ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.

रूफ टॉफ सोलरची राज्यातील संख्या 1 लाख 23 हजार 577 इतकी झाली आहे. त्यांच्याकडून एकूण एक हजार 860 मेगावॉट इतकी विद्युत निर्मिती होत आहे. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील तब्बल 20 हजार 150 रुफ़ टॉपचा समावेश असून त्यांची 205 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता आहे. राज्यातील एकून सोलर रुफ़ टॉपचा विचार करता 16.30 टक्के सोलर रुफ़ टॉप एकट्या नागपूर जिल्ह्यात आहे.

आकडे बोलतात

सहा वर्षांपूर्वी राज्यामध्ये केवळ 1 हजार 74 ग्राहकांकडून 20 मेगावॉट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण होत होती, गेल्या सहा वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या 1 लाख 23 हजार 577 इतकी झाली आहे, मागिल वर्षी ही संख्या 76 हजार 808 इतकी होती. यातून सौरऊर्जा निर्मितीची क्षमता एक हजार 860 मेगावॉट वर पोहोचली आहे, मागिल वर्षी ही क्षमता 1 हजार 559 इतकी होती.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून वाढत्या संख्येने ग्राहक सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलरला पसंती देत आहेत. मागिल नऊ महिन्यात नागपूर जिल्ह्यात सुमारे 6 हजार ग्राहकांनी सोलर रूफ टॉप बसविले असून त्यांची क्षमता सुमारे 49.2 मेगावॅट इतकी आहे.

सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे ग्राहकाचा नेहमीपेक्षा कमी वीज वापर होतो, त्यामुळे वीजबिलात देखील कपात होते. याशिवाय ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीज बिल येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

योजनेच्या लाभासाठी

घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे, सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते, तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे एक लाख 57 हजार खर्च येतो, त्यामध्ये सुमारे 54 हजार रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकांना जवळपास 1 लाख 3 हजार रुपये खर्च येतोसौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी तीन किलोवॉट ते दहा किलोवॉट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. यासाठी पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते.

सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या महावितरणच्या रूफ टॉप सोलरचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM मोदी 21 जनवरी को ही अयोध्या पहुंच सकते हैं, खराब मौसम के चलते शेड्यूल में बदलाव

Fri Jan 19 , 2024
अयोध्या :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्राण प्रतिष्ठा से एक दिन पहले यानी 21 जनवरी को अयोध्या पहुंच सकते हैं। इसकी वजह प्राण प्रतिष्ठा का मुहूर्त और मौसम बताया गया है। दरअसल, सुबह के वक्त घना कोहरा छाया रहता है। इससे फ्लाइट लैंडिंग में मुश्किल आ सकती है। इसलिए, PM का एक दिन पहले आने का कार्यक्रम बन रहा है। प्रतिष्ठा का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com