शासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढवा – जिल्हाधिकारी

भंडारा :- मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीने विविध उपक्रमाचे आयोजन करावे तसेच शासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी समितीच्या बैठकीत दिले.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह अशासकीय सदस्य स्मिता गालफाडे व सुमंत देशपांडे उपस्थीत होते.या समितीत जिल्हा माहिती अधिकारी व ग्रंथालय अधिका-यांचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

जिल्हयातील सर्व शासकीय आस्थापना व दुकानातील पाटया मराठीत कराव्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन कर्मचा-यांनी करावे,तसेच शासकीय कार्यक्रमात मराठी पुस्तकांची भेट मान्यवरांना दिली. ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीव्दारे शिक्षणाधिका-यांनी विदयार्थ्याना वाचनासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यादव ने प्रधानमंत्री को पत्र लिख कोल इंडिया अधिकारियों की कारगुज़ारियों की ओर कराया ध्यानाकर्षण

Tue Sep 12 , 2023
– लाखों कोयला मज़दूरों व भू-आश्रितों को अकारण प्रताड़ित कर केंद्र सरकार को बदनाम करने की साज़िश का जताया अंदेशा नागपुर :- कोयला श्रमिक सभा (एच.एम.एस.) के केंद्रीय अध्यक्ष-सह-जेबीसीसीआई सदस्य शिवकुमार यादव ने भारत के प्रधानमंत्री माननीय नरेन्द्र मोदी को पत्र लिख कोल इण्डिया के अधिकारियों द्वारा कोयला मज़दूरों तथा भू-आश्रितों को प्रताड़ित कर एक षड़यंत्र के तहत वर्तमान केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com