शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ

नवीमुंबई :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार, दिनांक. 26 जून 2024 रोजी सकाळी 8.00 ते सायं 4.00 अशी निश्चित करण्यात आली होती. परंतू आता भारत निवडणूक आयोगाने दिनांक 03 जून,2024 रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 56 नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे. मतदानाची नवीन वेळ बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक 26 जून,2024 रोजी पदवीधर व शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात मोदीलाट नाहीच? पंतप्रधानांच्या सभा होऊनही १८ पैकी ‘या’ १५ उमेदवारांची झोळी रिकामीच

Tue Jun 4 , 2024
मुंबई :- मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये (२०१४ आणि २०१९) देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहायला मिळाली. मोदींच्या या लाटेमुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने बहुमताचा टप्पा गाठला होता. भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत २८२, तर २०१९ च्या निवडणुकीत ३०२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे गेली १० वर्षे मोदी देशाचं पंतप्रधानपद भूषवत आहेत. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट पाहायला मिळाली नाही. अनेक राजकीय विश्लेषकांसह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com