‘सर्वसामन्यांच्या सूचना, भाजपचा जाहिरनामा’चा शुभारंभ, नागरिकांनी आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन

नागपूर :- भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा तयार करण्यासाठी जनतेमधून सूचना मागविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘माझ्या सूचना, माझा जाहिरनामा’ , ‘नागरिकांच्या सूचना , भाजप चा जाहीरनामा’ अभियानाचा गुरूवारी (ता.२१) भारतीय जनता पार्टी नागपूरच्या वतीने शुभारंभ करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी नागपूर प्रदेश कार्यालयामध्ये गुरूवारी (ता.२१) जाहिरनामा समितीची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभियानाची सुरूवात करण्यात आली. जाहिरनामा समितीच्या बैठकीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, समितीचे मुख्य संयोजक माजी आमदार गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, सी.ए. मिलींद कानडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रदेश कार्यालय सह मंत्री संजय फांजे, गिरीधारी मंत्री, डॉ. गिरीश चरडे, तेजिंदरसिंग रेणू, आशिष मुकीम, किर्तीदा अजमेरा, चेतना टांक, दिपेन अग्रवाल, अश्वीन मेहाडिया, विनय जैन, सुरेश राठी आदी उपस्थित होते.

नागपूर लोकसभा मतदार संघासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावरील कार्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांमधून सूचना मागवून त्याआधारे भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा तयार केला जाणार आहे. यासंदर्भात भाजपा नागपूरतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसात देत विविध क्षेत्रातील मान्यवर नागपूरसह देशाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक महत्वाच्या सूचना मांडत आहेत.

गुरूवारी सुरू झालेल्या अभियानामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील उद्योजक, सी.ए. तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना बॉक्समध्ये टाकल्या. नागपूर लोकसभा मतदार संघ तसेच देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये भर घालू शकणा-या महत्वाच्या सूचना नागरिकांनी भाजपा कार्यालयातील बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन, भाजपा नागपूर शहर तर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - नागपूर विभागात आज एक नामनिर्देशनपत्र दाखल

Thu Mar 21 , 2024
Ø विभागात आतापर्यंत ३८७ नामनिर्देशनपत्राची विक्री नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी आज नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघापैकी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. तर या पाचही मतदारसंघामध्ये गेल्या दोन दिवसात ३८७ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मानकर यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.विभागातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!