नागपूर :- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशन (CITI CDRA) मुंबई मार्फत कॉटन कोल्याबोरेशन प्रोजेक्ट अंतर्गत कपाशीवरिल गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण जनजागृती रथ (मोबाईल व्हॅन) चा शुभारंभ 22 नोव्हेंबरला राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनी, “ॲग्रोव्हिजन, पीडीकेवी ग्राउंड, दाभा, नागपूर” येथे करण्यात आला. सदर शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉ. सि.डी.माई अध्यक्ष ऍग्रो व्हिजन सल्लागार समिती, यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी डॉ. यशवंत गडाख, कुलगुरू पीडीकेवी अकोला, डॉ. वाय.जी.प्रसाद, डायरेक्टर सीआयसीआर, नागपूर, डॉ पंडियन, इन्चार्ज जीटीसी सिरकॉट, नागपूर, रवींद्र मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर, डॉ. सौ. अर्चना कडू, प्रकल्प संचालक आत्मा नागपूर. गोविंद वैराळे, प्रकल्प समन्वयक सिटीसिडीआरए, म.शा. उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रथा ला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
मोबाईल व्हॅन जनजागृती रथाचा मार्ग नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांमधून जवळपास 160 गावांमध्ये जाणार आहे. कापसाची हलक्या मध्यम जमिनीमध्ये सघन पद्धतीने लागवड (एचडीपीएस, क्लोसेर स्पेसिंग) करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यात येणार असून गुलाबी बोंड अळीचे निर्मूलन व व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे.
मागील वर्षी सुद्धा रथाचे आयोजन करण्यात आले होते. सिटीसीडीआरए द्वारा घेण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्यात एचडीपीएस लागवड पद्धतीने शेतकऱ्यांना 18 ते 19 क्विंटल प्रति एकर कापसाचे उत्पादन आले असून दोन शेतकऱ्यांची यशोगाथा सुद्धा रथावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. रथाद्वारे स्पीकर मध्ये ऑडिओ पद्धतीने प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. हिंगणा, कळमेश्वर, वर्धा, देवळी, वरोरा, भद्रावती, राळेगाव, कळंब, धामणगाव रेल्वे, तिवसा, चांदुर रेल्वे, अमरावती या एकूण 12 क्लस्टर मधील प्रकल्पातील प्रत्येक गावात मोबाईल व्हॅन फिरून जनजागृती करण्याचे नियोजन केले आहे. जगदीश नेरलवार, प्रकल्प अधिकारी, यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. युगांतर मेश्राम प्रकल्प अधिकारी, राहुल ढाले, उमेश कापगते कापूस विस्तार सहाय्यक यांनी सहकार्य केले.