संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी ( रडके ) येथे नुकतेच १८ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच , उपसरपंच आणि इतर सदस्यांचा पदग्रहण सोहळा सोमवार दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी लोखंडे आणि ग्रामसेवक आतिश देशभ्रतार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी सरपंच सुनील मेश्राम, उपसरपंच दिनेश बडगे व इतर सदस्यांना सन्मानाने निरोप देण्यात आला.
यंदाच्या निवडणुकीत आजनी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय जीवतोडे यांना गावकऱ्यांनी बहुमताने निवडून दिले आहे. त्यांचा पदग्रहण समारंभ ५ जानेवारीला पार पडला.तर उपसरपंच म्हणून सामाजिक कार्यकर्ते हेमराज दवंडे यांच्या गळ्यात माळ पडली.
या निवडणुकीत गणपत झलके, शंकर भोयर, अंकिता हेटे, श्वेता चौधरी, हेमलता उकेबोंद्रे, गायत्री हरणे, प्रियंका किरनायके, अनिकेत इंगोले हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या पदग्रहण समारंभात माजी पंचायत समिती सभापती उमेश रडके, भगवंतराव रडके, डॉ विजय रडके, माजी सरपंच तुकाराम लायबर, दिवाकर घोडे, रितेश मरसकोल्हे, संगीता चव्हाळे, लीलाधर वाणी, खुशाल येलेकार, गजानन दवंडे, धर्मराज येलेकार, गजेंद्र वाट, धर्मराज हेटे, दीपक घोडे, कवडू चीचुलकर, शेषराव भोयर, नरेश जीवतोडे, दिनेश मेश्राम, बळीराम फुकट, सोमाजी खंडाते, नारायण हिवरकर, मनोहर कळमकर, गुणवंत राऊत, ग्राम पंचायत कर्मचारी योगेश नागपूरे, कृष्णा ठाकरे, भीमराव नागोसे, नारायण वैद्य, प्रिया चव्हाळे, आदी गावकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्व गावकरी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असल्याची ग्वाही यावेळी उपसरपंच हेमराज भाऊ दवंडे यांनी दिली.